Dictionaries | References

लसलसणे

   
Script: Devanagari

लसलसणे     

अ.क्रि.  लसलस करणे .
रसरसणे ; सळसळणे ; खळबळ करणे ( पाणी इ० ).
क्षत इ० कांत किडे इ० कांनी वळवळ करीत असणे ; बुजबुजाट होणे .
भर येणे ; भरज्वानी येणे ( तारुण्याची धमक , तेज ).
लुसलुसणे ; टवटवणे ; तकाकणे ; प्रफुल्लित होणे .
अति उत्कंठित होणे .
वखवखणे . [ सं . लस . द्वि . ] लसलसाट - पु . ( लसलसचा अतिशय ) बुजबुजाट ; वळवळ . ( क्षतांत किंवा नासक्या पदार्थांत किडे इ० कांची ) [ लसलस ] लसफशीत , लसफसीत - वि .
ढील ; शिथिल ; भोंगळ ; घट्ट ; अटस नसलेले ( पागोटे , वेणी इ० ) लसलशीत , लसलसीत - वि .
अतिशय तप्त ; फार खवळलेला ; उसलसणारा , फसफसणारा ( द्रव पदार्थ ).
झपाट्याने बुजबुजणारे ( क्षतांतील इ० किडे ); बुजबुजाट असलेले .
लुसलुशीत ; टवटवीत ; टकमकीत . तैसे हृदयी अष्टदळ । अधोमुख ऊर्ध्वनाळ । अतिकोमल लसलसित । - एभा १४ . ४६५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP