Dictionaries | References

रुधणे

   
Script: Devanagari
See also:  रुंधणे

रुधणे     

स.क्रि.  
रुजणे पहा .
अडवणे ; रोधणे ; अडथळा आणणे ; प्रतिबंध करणे . तै गजबजो लागे कैसा । व्याधे रुंधला मृगु जैसा । - ज्ञा १३ . १८६ .
व्यापणे ; बंद करणे ; वेढणे ; भरुन काढणे . आणि आथी नाथी तितुके । रुंधले असे येणेंचि एके । कल्पांतीचेनि उदके । ब्योम जैसे । - ज्ञा १५ ५३ . [ सं . रुध ] रुधणे , रुंधणे , रुंधवणे - अक्रि .
अडथळा येणे ; अडकून पडणे ; थांबणे .
( रस्ता , वाट , जागा इ० ) माणसे , गाड्या इ० च्या दाटीमुळे अडणे किंवा त्यांतून जाणे कठिण किंवा अशक्य होणे ; भरुन जाणे ; पूर्ण भरल्याने बंद होणे . स्वरुपे कृष्णाच्या अविरत जिचे मानस रुधे । - सारुह ७ . ८१ .
धंदा - उद्योगांत गुंतलेला असणे ; एखाद्या गोष्टीने व्यापला जाणे ; एखाद्या कामांत अडकला जाणे ; गुंतणे . [ सं . रुध ] रुधविणे - सक्रि . ( मनुष्य , प्राणी , वस्तु ) गुंतविणे ; कामाला लावणे ; उपयोगाला आणणे ; उद्योगांत अडकविणे . [ रुधणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP