Dictionaries | References

रिघणे

   
Script: Devanagari

रिघणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

रिघणे

 अ.क्रि.  
   दाटीमध्ये किंवा अडचणीच्या जागेमध्ये बळाने प्रवेश करणे ; शिरणे ; घुसणे .
   जाणे ; निघणे ; आंत जाणे . प्रभुच्या पाठीसी तदनुजाधव रिघाला । - मोस्त्री ३ . ५६ .
   सुरण , रताळे इ० कंद जमिनीत मोठे वाढणे पोसणे , धरणे .
   घडणे ; घडून येणे . रिघणी - स्त्री . रिघाव ; प्रवेश . रिघिनिघी , रिघनिघ - स्त्री . रिगनिग ; जाये ; येजा . रिघाव - वा - पु . शिरकाव ; प्रवेश ; वाट ; मार्ग . की तस्करी होतां घरांत रिघावा । त्यासहि प्रकाश देई जैसा दिवा । - नव १६ . १६४ . रिघू , रिघु - पु .
   रिघाव ; प्रवेश .
   समज ; ज्ञान . गर्वाभिमान्या न होय रीघु । - दावि ३४३ . रिघेरिघे - क्रिवि . हळूहळू ; सावकाश .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP