Dictionaries | References

रमणीक

   
Script: Devanagari

रमणीक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : रमणीय

रमणीक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Delightful, suitable for dalliance and sport--a place.

रमणीक     

वि.  रम्य ; आनंददायक ; रमणीय ( स्थल इ० ) रमणीक याचेसरी । पट्टण आन असेना । - मुआदि ४६ . २० . [ सं . रमण ] रमणीकपणा - न . रमणीयता ; रसज्ञता . रमणीकपणें पांहतां मन । कदा काळीं नुठावें । - मुआदि ३५ . ६१ . रमणीय - वि . रम्य ; मनोहर ; सुखावह ; शोभिवंत ( जागा , मूर्ति , काव्यार्थ इ० ). रमणीयता - स्त्री . मनोहरत्व ; सौदर्य . [ सं . ] रमणूक - स्त्री .
चैनीखातर फिरणें ; विहार .
मनोरंजन ; करमणूक . [ रमणें ] रमणें - अक्रि .
कांहींएक विषयाची गोडी लागल्यामुळें तेथें चित्तवृत्ति आसक्त होऊन रहाणें . पुष्पाचे सुगंधावर भ्रमर रमतो .
बागबगीचा , चांदणें इ० उपभोग्य जे विषय , तदुपभोगद्वारां विनोद करीत काळ घालविणें .
रेंगाळणें ; गमणें . संभाषणांत किंवा खेळण्यांत वेळ घालविणें . लवकर जा . वाटेस रमूं नको .
विलास करणें ; मैथुनार्थ संगत होणें , जुळणें . [ सं . रमण ] रमतरमत , गमत , रमते रमते - क्रिवि .
स्वस्थपणें ; सुखानें ; सहज ; बिनत्रासानें ; घाई न करितां ; विशेष तसदी न घेतां ( काम करणें इ० );
बागबगीचा , चांदणें , वायु इ० कांपासून करमणूक करीत . ( क्रि० जाणें ; येणें ; चालणें इ० ). ( रमते रमते हें हिंदी रुप आहे ). रमताराम - पु . भटक्या , फिरस्ता , प्रवासी माणूस ; विशेषतः तीर्थें हिंडणारा गोसावी . [ रमणें राम ] रममाण , - वि . रमणारा ; आसक्त ; गुंग ; तल्लीन ; रंजित . रमविणें - क्रि . रंजन करणें ; रंजविणें ; करमणूक करणें ; सुखविणें . [ रमणें ]

रमणीक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : रमणीय

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP