Dictionaries | References म म्हणऊन Script: Devanagari See also: म्हणवून , म्हणून , म्हणोन Meaning Related Words म्हणऊन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( काव्य ) त्यामुळें ; त्या कारणास्तव ; त्यासाठीं ; यावरुन ; तस्मात , सबब ; त्याअर्थीं . त्यानें मला शिवी दिली म्हणून म्यां तोंडी मारलें . पूर्वोत्तर किर्यांचा कार्य - कारणभाव असतां कारण क्रियावाचकापुढें याचा प्रयोग होतो जसें - नदीस पूर आला म्हणून मी अलीकडे अडकलों .असें ; इत्यादि ; याप्रकारचें , अर्थाचें . मी तुझे घरीं येईन म्हणून म्हणाला . राजानें माझें घर लुटलें आणि माझी चौघांमध्यें अगदीं अप्रतिष्ठा केली म्हणून ( असें ) हा बोलतो .वि. म्हटले जातें तें ; या नांवाचें . साप म्हणून एक भयंकर प्राणी आहे .अर्थशून्य पादपूरक ; जोर देतांना हा शब्द योजतात . उदा० कोठें म्हणून कोठे ? [ म्हणणें ]०का म्हणा किंवा काय ह्या शब्दानें जोर व्यक्त होतो . जसें :- गहू म्हणून का ( म्हणा ; काय ) जोंधळा म्हणून का ( म्हणा ; काय ) जो जिन्नस पाहिजे तो आहे . कधीकधी अधिक जोर किंवा अधिक स्पष्टता दर्शविण्यासाठीं कांहीं सर्वनामें व क्रियाविशेषणें यास म्हणून हा शब्द पुढे जोडून उपयोग करितात . कोण म्हणून ? काय म्हणून ? कोठें म्हणून ?०शानि म्हणून .०साठीं क्रिवि . एवढ्यासाठीं ; यास्तव ; म्हणून ; सबब ; तस्मात ; अर्थात इ०हणोनि क्रिवि . याकरितां . ध्रुवस्तवनि आवडी धरि म्हणोनि अत्यादरें । - केका ६२ . आधार हा मज म्हणोनि गणोनि डोले । - र ७५ . म्हणौनि अ . म्हणून . म्हणौनी त्रिभुवनी विख्यातु । - उषा ७ ६३ . [ सं . भण = म्हणणें ] म्हणौनु म्हणून . म्हणौनु धातुसोधन . - वैद्यकबाड ७८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP