Dictionaries | References

मोडणें

   
Script: Devanagari

मोडणें

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  साबुद्द वचपाची आनी आंग फडफडपाची व्याधी   Ex. मोडण्याची पिडा बरी जावं येता
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
   see : आताक

मोडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

मोडणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   break; destroy; break up.
   change. spend.
 v i   be included in. pass. become desolate.
मोडून काढणें-टाकणें   non-plus in argument; confute.

मोडणें

 स.क्रि.  उकरणें . जैसा न मोडिलिया विहिरामग आपलिया उगमीं झरा । भरोनि ठाके । - ज्ञा १५ . २६९ . [ सं , मुट , मुड = मोडणें ; सं . मोटन ; प्रा . मोडण ; हिं . मोडन ] मोडणें शब्द उत्तरपदीं येणारे कांहीं वाक्यप्रचार ( एखाद्याचें ) मन मोडणें = त्याच्या इच्छेविरुद्ध जाणें , न ऐकणें ; त्याची आज्ञा निष्फळ करणें ; मर्जीच्या उलट जाणें . घर मोडणें = कुटुंबातील माणसांची पांगापांग करणें . प्रॉमिसरी नोट मोडणें = ती बाजारभावानें विकून मोबदल्याचे पैसे घेणें . दिवस मोडणें = दिवस खर्च करणें . भय मोडणें = भय घालविणें ; भीति वाटेनाशी करणें . चालरीत मोडणें = चालरीत सोडणें , तीपाळणें . मातीचे चित्र मोडणें = तें छिन्नभिन्न करणें .
 अ.क्रि.  
 स.क्रि.  
   तोडून खाली टाकणें , पाडणें ; नाश करणें ; बिघाड करणें , ( इमारत इ० ); विस्कळित करणें ; भग्न करणें ; नाहींसें करणें ( मोडणें आणि तोडणें ह्या दोन्हीहि क्रियापदांचा हा सर्वसामान्य अर्थ आहे . तरी पण दोहोंच्या अर्थांत बराच भेद आहे . ( तोडणें पहा . ) तोडणे याचा अर्थ कांहीं तरी मोठें , अचानक , भयंकर कृत्य करुन तीक्ष्णधारी जोरकस हत्याराचा उपयोग करुन किंवा जोरानें किंवा एकदम हिसकून एखाद्या वस्तूचा नाश करणें . आणि मोडणें म्हणजे पदार्थांच्या आकारांत , स्थितींत बदल करणें . उदा० रान तोडणें आणि रान मोडणें हे दोन वाक्यप्रचार घेतले तर पहिल्यांतील तोडणें याचा अर्थ रानांतील झाडें तोडून , छाटून , खांडून नाहींशी करणें व मोडणें याचा अर्थ रानांतील झाडझुडूप काढून साफसफाई करणें असा अर्थ ध्वनित होतो . ) जसें :- देशपद्धति मोडणें . त्याचें लग्न त्यानें मोडलें .
   भग्न होणें ; छिन्नविच्छिन्न होणें ; विस्कळित होणें .
   तुकडे करणें ; भाग किंवा अवयव वेगवेगळे करणें ( यंत्राचे इ० ).
   र्‍हास पावणें ; अपकर्ष पावणें ; कमी होणें .
   ( एकादशी ) निष्फळ होणें .
   वांकवून तुकडा करणें ( कांठी , वेत , लांकूड इ० चे ) खुडणें . ( धान्याचीं कणसें , भुट्टे इ० ). जादुगारानें काठी मोडलेली आम्ही पाहिली .
   तोडणें ; नाहींसा करणें ( मैत्री , संगत , दुकानदारी , व्यवहार इ० ).
   मोडून जाणें ; भाराखालीं , दाबाखालीं नमणें .
   प्रकृति खालावणें ; र्‍हास होणें .
   विस्कळित होणें ; विस्कट होणें ; पांगापांग होणें ( बाजार , मंडळी , सभा , कौन्सिल इ० ची ). म्हैस उधळल्यामुळें सभा मोडली .
   ओसाड होणें ; निर्जन होणें ; लोकांची वस्ती नाहीशी होणें .
   खुरदा किंवा नाणें करुन आणणें ( मोहरा , रुपया यांचें ) एक रुपाया मोडून नाणें , खुर्दा घेतला . पैसे करणें ; ( दागिन्याचे , धातूच्या भांड्याचें ). विक्री करुन पैसे घेणें ( जनावराचे , वस्तूचे ).
   दिवाळें वाजणें ; मोडतोड होणें .
   भंग करणें ; अडथळा करणें ; बिघाड करणें ( झोपेचा , शांततेचा , चालू कामाचा , उद्योगाचा इ० ).
   बंद पडणें ; चालूं नसणें ( उद्योग , कारखाना , धंदा ).
   बिघडविणें ; नाखूश करणें ; अवमानणें ( मन , मर्जी , इच्छा , हेतु ). पितृसत्यपालना प्रभु कैकेयीचें न चित्त मोडून । - मोरामायणें १ . ४८४ .
   बिघाड करणें ; रचना , जुळणी नाहींशी करणें ; विस्कटणें ( पागोटें , निर्‍या इ० ).
   नांवाखालीं येणें ; मध्यें अंतर्भाव होणें ; जाणीव होणें ; पोटांत , सदरांत येणें , अंर्तभूत होणें . पुणें शहरांत भांबुर्डा मोडतो हिंदुस्थानांत लंका मोडते .
   स्मृतीतून नष्ट होणें ; विस्मरण पडणें ( आचार , रुढी , पद्धत यांचें ).
   नाहींशी करणें ; ओसाड पाडणें ; ( वस्ती , गांव , वसाहत ).
   खंडण करणें ; पाडाव करणें ( पक्ष , मत , वाद इ० चा ).
   ( अशक्तपणामुळें , अधिक श्रमामुळें ) ढिलें पडणें ; हतबल होणें ; त्राण नाहींसा होणें ; कसकसणें .
   खर्च करणें ; नाश करणें ; गमावणें ; घालविणें ; बुडविणें ( वेळ , काळ , दिवस ).
   तुटणें . अंग मोडून येणें , मोडून येणें - कसकस येणें ; तापाची कसर येणें ; हातपाय मोडून येतात . मोडतें घेणें - नाकबूल करणें ; इनकार करणें ; नाकारणें ; माघार घेणें ; मागें हटणें ; पाऊल मागे घेणें . मोडता काळ - पु . अपकर्षाचा , मंदाईचा काळ . मोडत्या काळीं जो धर्म करील तो धर्मात्मा . [ सं . मुट = चूर्ण करणें ; ठार करणें ]
   जोर हटविणें , नाहींसा करणें ; शमविणें ; दाबून टाकणें ; घालविणें . ( तहान , भूक , काळजी , संशय , भय ).
   जिरविणें ; कमी करणें ; घालविणें ( खोड , व्यसन , गर्व , इ० ).
   स्थिरस्थावर करणें ; सांत्वन करणें ; नाहींसे करणें ( भांडण , झगडा , दंगा ).
   भंग करणें ; अतिक्रमण करणें ; उल्लंघन करणें ( कायदा , हुकूम , आज्ञा , वचन , करार इ० ).
   रद्द करणें ; बंद करणें ; काढून टाकणें ( कायदा ; नियम , विधी , संस्कार , समारंभ ).
   दिवाळें काढणें ; नाश करणें ; मोडतोड करणें .
   पुसून टाकणें ; नाहींशी करणें ; खरडून टाकणें ; मागमूस दिसूं न देणें . गाडीची वाट फेसाटीनें मोडावी . मोडणें हें तोडणें या क्रियापदाहून भिन्न आहेच परंतु याच अर्थासारखें भासणारें फोडणें या क्रियापदाहूनहि भिन्न आहे . फोडणें पहा . मोडून टाकणें , काढणें -
   म्हणणें किंवा बोलणें खुंटविणें ; गोंधळविणें ; कुंठित करणें ; निरुत्तर करणें .
   पराजित करणें ; फजित करणें . त्याचा हा परिपाक आजि दिसतां या पंडिता मोडिलें । - सारुह ६ . ६४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP