|
न. न. लांकुड किंवा दगड कामांत राहिलेली खांच , फट , चढ . एका दोरींत नसलेला भाग . जानुसंधि ; गुडघ्याचा सांधा . घोडा चाल इ० नीं थकला असतां त्याच्या ढोपरासंबंधीं योजतात ( सामान्यतः अनेकवचनी प्रयोग . ( क्रि० मोडणें ; घेणें ; धरणें ; दुखणें ; थकणें ). घोड्याचीं मेटें मोड . चौकी ; पहारा ; गस्त ; पाहर्याची जागा , ठाणें ( डोंगरी किल्ल्याच्या वाटेंतील वळणावरचें , तंटबंदी गांवाच्या वेशीच्या बाहेरील बाजूस किंवा प्रांताच्या सरहद्दीपाशीं असलेलें बहुधां महारांच्या वस्तीचें ). अहंकाराचें मेट होतें । - एभा ५ . ५६१ . ( कु . ) दार धरणें ; लग्नांतील एक सोहळा ( वरात आल्यावर गृहप्रवेशाच्या वेळीं वराची बहीण दार आडवून धरते व या वधुवरांस जी मुलगी होईल ती आपल्या मुलास देण्याविषयीं त्यांस वचन मागते ). अवसान ; हिंमत . ( क्रि० बसणें ). [ मिटणें ] ( वाप्र . ) ०पडणें हातपाय गाळणें , गळणें . धांप कांप पडे मेट । - एभा १२ . ५७४ . ०मारणें मारुन पडणें - ( बैल इ० च्या ) शरीराचा लोळागोळा होऊन पडणें . ०मारणें मारुन बसणें - पाय दुमडून गुडघ्यावर हनुवटीस टेकून बसणें . मेटा असणें - ( माण . ) मुडा असणें . मेटेंखुंटीस मेटाखुटी मेटाकुटीस येणें - मांडी घातलेली काढून गुडघ्यावर उभें राहणें ( एखाद्यास मारण्याकरितां वादांत वरचष्मा होण्याकरितां नेटानें खेंचण्याकरितां , ओढण्याकरितां गुडघे टेकून उभें राहणें . ( मनुष्य , पशु यांनीं ). ढोपरखुंटीस येणें ; म्हातारपणामुळें गुडघे खचणें . हट्टास पेटणें . हमामा घालिती कडोकडी । मेटाखुंटी येऊनियां । - ह १० . ९५ . शिकस्त करुन कंटाळणें ; अगदीं दमणें , त्रासणें . मेटेखुंटीस बसणें - गुडघे टेकणें . मेटें घालणें - रडकुंडीस येणें . गुढघ्यांत डोकें खुपसणें . गुडघे जमिनीवर टेकणें . मेटें घालून सांवरी । - वेसीस्व ४ . ९९ . ०घेणें ( मल्लविद्या ) खुरमुंडी घेऊन हिसडा देणें . ०टेंकणें गुडघे टेंकणें . वार्धक्यामुळें , अशक्ततेमुळें गुडघे मोडणें ; खचणें . ( ल . ) खचणें ; डगणें . ०धरणें संधिवातानें गुडघे आंखडणें ; दुखणें . ०बसणें वार्धक्यामुळें व अशक्ततेमुळें अवसान खचणें . ( ल . ) कचरणें ; कचणें ; धीर खचणें . ०वळणें गुडघे हनुवटीला टेकून गुडघ्याभोंवती दोन्ही हातांचा विळखा देऊन बसणें . सामाशब्द - मेटकरी , मेटेकरी पु . मेट्यावरील , नाक्यावरील चौकीदार . मेटेकरी अष्टौदिक्पाल । - रंयोवा ६ . ८७ . मेटका स्त्री . स्नायुमय भागांत उत्पन्न होणारा वायूचा गोळा ; पेटका पहा . मेंडका , मेंडकी पहा . मेटाकुटी , मेटेंकुटी , खुटी , खुंटी - स्त्री . ढोंपर टेंकून बसण्याची रीत ; ढोंपरखुंटी . महत्प्रयास ; निकर .
|