Dictionaries | References

मिळण

   
Script: Devanagari

मिळण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 f combination, consociation, confederacy, alliance, union. Ex. त्या बंडवाल्याचे मिळणीस जितके होते तितके धरले; हे सारे एका मिळणीचे आहेत.

मिळण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  combination, union.

मिळण

  न. आमटी , भाजी इत्यादि मिळून येण्याकरितां त्यांस लावावयाचें पीठ [ सं . मेलन ] मिळण , णी - नस्त्री .
   एकत्र होणें ; मिलाफ ; संबंध ; मिश्रण ; एकी .
   संगम . सागर - सरिता जीवन एकपरी मिळणीं भजन दिसे अधिक । - एभा १ . ९५ .
   संसर्ग ; भेट ; स्पर्श ; संयोग ; संबंध ; मेळ . सत्संगसूर्याचे मिळणीं निर्विकल्पकमळणी । विकासे । - एभा २६ . ४३८ .
   एकरुपता . कृष्णमिळणीं मिळाल्या । त्याही न फिरती । - तुगा १२८ .
   मीलन ; एकत्र जुळणें , जमणें . तेही तेही ठाई मिळणी । समयो सांजवेळु कां रजनी । - ज्ञा १७ . २९५ . मिळणीं मिळणें - भेटणें ; एकत्र येणें ; संयोग - संगम होणें . मिळणीं मिळणींत , मिळणीस असणें , चालणें , मिळणें - एखाद्याच्या तंत्रानें चालणें , मिळून जाणें ; कह्यांत , ताबेदारींत असणें . मिळणीस मिळणें - संगम होणें ; एखाद्याशीं मिळून जाणें . मिळणी होणें - भेटणें . मिळणें - अक्रि .
   ( द्रव्य , लाभ , नोकरी , पदवी इ० ) प्राप्त होणें ; हस्तगत होणें .
   एकत्रित होणें ; मिसळणें .
   एकरुप होणें ; एकत्रित , एकजीव होणें ; एकमत होणें .
   जुळणें ; अनुरुप किंवा अनुकूल होणें ; बरोबरीचें होणें ; एखाद्याप्रमाणें - सारखें असणें .
   एखाद्याच्या बाजूचा होणें ; एखाद्या विशिष्ट पक्षाचा , मताचा , धोरणाचा होणें . पार्थासीं नमुनियां अजा मिळ रे । - मोभीष्म १२ . ५२ .
   भेटणें ; भिडणें ; टेंकणें ; गांठ पडणें ; संयुक्त होणें ; समोरासमोर येणें .
   सांपडणें ; आढळणें ; दृष्टोत्पत्तीस येणें ; दिसणें ; पाहिलें जाणें .
   पकडींत येणें ; धरुं येणें ; हातांत येणें . हा खिळा अवघड ठिकाणीं बसला , ह्यास धरायला मिळत नाहीं .
   शक्य होणें ; शक्य असणें . हें कुलूप भलत्याला उघडायला मिळणार नाहीं .
   ( गो . ) रतिभावनेनें अंगीकार करणें .
   गुरफटला जाणें ; अडकणें . मिळेना कदा कल्पनेचेन मेळीं । - राम ५४ .
   नफा ; फायदा होणें ; उत्पन्न होणें . [ सं . मिल = भेटणें ] म्ह० मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक . मिळून मिसळून वागणें - मित्रत्वाच्या , घरोब्याच्या , समतेच्या नात्यानें वागणें . मिळता - वि . जुळता ; मिळणारा . मिळता काळ - पु . भरभराटीचा काळ ; प्राप्तीची वेळ ; मिळण्याचा काल . मिळताऊ - वि .
   बरोबरीच्या लोकाशीं लवकर मिसळून जाणारा ; दुसर्‍यांशीं आपलें पटवून घेणारा .
   जिंकणारा , मिळविणारा . मिळताव - पु
   प्राप्ती ; मिळकत ; फायदा .
   सामील होणें . मिळती वस्त - स्त्री . मिळवितां येण्यासारखी वस्तु ; ज्याची नुकसानभरपाई करतां येईल असा माल . पोर मिळवतीवस्त आहे . परंतु आईबाप मिळवतीवस्त नाहींत . [ मिळणें + वस्तु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP