Dictionaries | References

मिठ

   
Script: Devanagari
See also:  मिठडा

मिठ     

वि.  गोड ; मिष्ट ; रुचकर ; मिठास . [ सं . मिष्ट ; प्रा . मिठ्ठं ] मिठाई - स्त्री . खाऊ , पेढे , बर्फी इ० साखरमिश्रित गोड पदार्थ . [ हिं . ] मिठा ठक - वि . गोडगोड बोलून फसविणारा .
 न. ( कों . ) मीठ पहा .
०बार  पु. पहिला बार ; बहर ; पहिलें पीक . ह्याच्या उलट खट्टाबार
०पाणा  पु. मिठाणा ; भाजलेले वाल इ० कडधान्यें यांची मीठ घालून शिजविलेली उसळ .
०वणी  न. मिठाचें पाणी . - स्त्री . ( राजा . ) स्वयंपाकाला लागणारी मीठ ठेवण्याची परडी , पाळें . [ मीठ + पाणी ] मिठागर न . मीठ तयार करण्याची जागा ; मिठाचें शेत [ मीठ + आगर ] मिठागरी , मिठागीर मीठ बनविण्याचा धंदा करणारी आगरी जात ; या जातींतील व्यक्ति . मिठागरीण स्त्री . मिठागरी जातीची स्त्री . मिठाणा पु . खारवून शिजविलेलें कडधान्य . - पु . खारी डाळ . मिठाणें न . मीठ ठेवण्याचें मातीचें भांडें . परळ . मिठाभोवो न . ( गो . )
०लिंबु  न. साखरलिंबू . मिठांश , शु पु . मिष्टांश ; गोडी . हें न निवडे मिठांशु । अमृतीं जेवी । - अमृ ५ . ७ . मिठास स्त्री . स्वादिष्टपणा ; माधुरी ; मिष्टता ; गोडी . मिठास , मिठ्ठास , मिठ्ठा वि . गोड . मिठाक्षर न गोड शब्द . मिठी स्त्री .
( गोड पदार्थ फार खाल्ल्यानें उत्पन्न झालेली ) अरुचि ; वीट ; तिटकारा , शिसारी . ( क्रि० बसणें ).
मिठाचें पक्वान्न .
( ल . ) निरुपयोगी वस्तु .
आवड ; छंद ; उत्कट इच्छा . [ सं . मिष्ट ]
०पडणें   गोडी लागणें ; ऐक्य पावणें . मिठेचावल पु . ( व . ) गूळ व गरम मसाला घालून केलेला भात ; गूळभात . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP