-
स्त्री. ( गो . ) १ दाट झाडी . २ ( गो . ) ( विटीदांडूच्या खेळांतील ) एक सप्तक ; झकू .
-
स्त्री. तकाकी ; चकाकी . जिल्हई पहा . झिलीची , झिल्हईची , झिल्लेची माती , झिल्हई , झिल्ली - स्त्री . भांडीं , हत्यारें साफ करण्याकरितां वापरतात ती पिवळसर तांबडी माती .
-
स्त्री. रत्न इ०कांवरील तेज . [ अर . जिला ; म . जिल्हई ] ( वाप्र . ) एखाद्याची झील उडणें , एखाद्याची झील उतरणें , एखाद्याची झील बिघडणें - ( एखाद्याचें ) वैभव खालावत जाणें , नष्ट होणें ; कीर्तीचा , मानमरातबाचा नाश होणें . झील चढणेंस - ( कर्त्याची षष्ठी ). ( एखाद्याच्या ) वैभवाची , मोठेपणाची भरभराट होणें . झील चढविणें - १ अगदीं तकतकीत , साफ हजामत करणें , तासणें . २ ( एखाद्यास ) नांवारूपास आणणें ; प्रतिष्ठा मिळवून देणें ; मोठेपणाला चढविणें .
-
न. ( प्रां . ) एका टोंकास जाळी लावलेली , झाडावरून आंबे इ० काढण्याची बांबूची आंकडी ; झेला . [ झेलणें ]
Site Search
Input language: