-
स्त्री. १ आई . ' म्हणोनि अंबे श्रीमंते । ' ' ज्ञा १२ . १० . २ राजपत्नी ; साध्वी इ० स आदरार्थी संबोधन . ३ दुर्गा ; भवानी ; पार्वती ( देवी ). अंबाबाई पहा . ' साह्मा नव्हेचि गे अंबा । विन्मुख जाहली जगदंबा । ' - एरुस्व ५ . ७३ . ( सं अंबा ; द्रा . अम्मा ; जर्मन अम्मा - मो )
-
पु. एक झाड व त्याचे मधुर फळ ; आंबा ; आम्र ; यांचें कोबळें फल अंबट व त्रिदोष , रक्तदोषकारक आहे . पिकलेले फळ गोड , शक्तिवर्धक , जड , वातनाशक आहे याचा रस सारक , स्निग्ध , बलकारक आहे . याची कोय तुरट ओकारी व अति सारनाशक आहे . याचा मोहोर अतिसार , प्रमेह व रक्तदोष नाशक आहे . याचें पानकफ व पित्तनाशक आहे . अंब्याला रंगावरून , स्थळावरून , व्यक्तिवरून व रुचीवरून निरनिराळी नांवें असतात . जसें ; शेंदरी , शिवापुरी , हपुस , शोपा इ० . आंब्याचें झाड हिंदुस्थानांत होतें . रानांत , डोंगरांत उगवणार्या अंब्याला रायवळ , बागेंत लावलेयास इरसाल व कमल केलेल्यास कलमी अंबा म्हणतात . याच्या कापा ( कापूर खाण्याचा ) व रसाळ ( रस काढण्याचा ) अशा दोन जाती आहेत . हें झाड पुष्कळ वर्षे टिकतें . कच्च्या आंब्याचें लोणचें व पाडाच्या आंब्याचा मुरंबा , गुळंबा करतात . ' पिवळा आणि सुंगध । अमृता ऐसा असे स्वाद । परी अंबा तव प्रसिद्ध । एकलाचि । ' - विउ १० . १९ . ( सं . आम्र ; प्रा . अंब ) - व्याचा - काप - तळका - पु . अंब्याचा एका , बाजुचा काप , फोड . - चा टाहाळा - डाहळा - ढाळा - पु . १ आंब्याची लहानशी फांदी . हा शुभ व अशुभ दोन्ही प्रसंगी असती यावरुन . २ ( ल .) शुभ - अशुभ प्रसंगी किंवा सुखदुःखाच्या प्रसंगी दुसर्याच्या घरीं सारखेपणानें वागणारा माणुस ; लग्न वगैरे समारंभांत दोहोंपक्षांकडील माणुस . - चा शेंकडा - ६ अंब्याच्या १ पाडा . ५३ पाड्यांचा ( ३१०आंबे ) १ शेंकडा संबंध शेंकडा घेतला तर ३२० अंबे मिळतात . निर निराळ्या ठिकाणी अंब्याचाशेंकडा निराळा आहे . कांही ठिकाणीं २२ पाड्यांचा शेंकडा असतो .
-
०उतरणें १ आंबे झाडावरुन खाली न पाडतां काढणें . ' आज आमच्या झाडाचें आंबे उतरावयाचे आहेत .' २ फार पिकणें . ' आंबा उतरला आहे ; कशाला खातोस ?'
-
०शिपणें वरात घरी जाण्याच्या पुर्वी गौरीहारांतील देवी घेण्याकरितां वर जातो तेथें गौरीहाराच्या जागीं भिंतीवर अंब्याचें झाड काढलेलें असतें , तेथें आंबा शिंपतांना वधु आपला डावा पाय वराच्या उजव्या मांडीवर आणि डाव्या हात त्याच्या पागोट्यावर ठेवून त्याजपाशीं उभी राहून उजव्या हातानें नागवेलीच्या किंवा आंब्याच्या पानानें आंबा शिंपते त्यावेळी बायका आंबा शिपण्याबद्दलचें गाणेम म्हणतात . ' आंबा शिंपावया गोरटी । कडे घेऊनि कृष्ण उठी । आहती केलीसे गोमटी । कुंकुमें वाटी परिपूर्ण । ' - एरुस्व १५ . १४२ .
Site Search
Input language: