Dictionaries | References

माघें

   
Script: Devanagari
See also:  मागें

माघें     

क्रि.वि.  
मागील , मागील ओढ इ० पहा .
गतकालीं ; पूर्वी ; अगोदर .
पाठीकडे ; पार्श्वभागीं . तो माझ्या मागें उभा होता .
नंतर ; पश्चात . माझ्या मागें मुलांचें कसें होईल याची मला काळजी वाटते .
( ल . ) वर अवलंबून . माझ्या मागें हजार कामें आहेत . [ सं . मार्ग = शोधणें ] म्ह०
पुढें पाठ मागें सपाट .
मागें एक पुढें एक - पुढें एक बोलणें आणि मागें विरुद्ध बोलणें , करणें , बोलणें व कृति यांत फरक असणें . मागें येक पुढें येक । ऐसा कदापि नाहीं दंडक । - दा १९ ४ . १८ .
०घेणें   फिरणें सरणें होणें हटणें - उलट खाणें ; परावृत्त होणें ; सोडून देणें . मी हें काम पथकरलें तें पथकरलें , आतां मी मागें घ्यावयाचा नाहीं .
०टाकणें   
( पैसा इ० ) शिल्लक ठेवणें .
भीतिग्रस्तास पाठीशीं घालणें . मला द्यावें जीवदान टाकावें मागें । - ऐपो १५९ .
०पडणें   
खर्च न होतां शिलकेस राहणें ; गांठीं पडणें ( द्रव्य ). काटकसरीनें खर्च करा म्हणजे चार पैसे मागें पडतील .
साफ बरा होणें ; निखालस जाणें ( दुखणें , त्रास ). माझी पोटदुखी अगदीं मागें पडली .
आठवणींतून आणें . आमच्या बरोबर फिरावयास या , म्हणजे तुमच्या आईच्या मरणाचें दुःख मागें पडेल .
रद्द होणें ; मोडणें . हा नियम आतां मागें पडला .
प्रगति कमी होणें . रामा महिनाभर आजारी होता म्हणून मागें पडला .
फिक्के पडणें ; महत्त्व कमी होणें . मिरजकरबुवांच्या कथा पुण्यास सुरु होतांच इतर सर्व हरिदास मागें पडले .
०पाडणें   ( मिळकत , वेतन इ० कांतून ) शिलकेस टाकणें ; संग्रही टाकणें .
०राहणें   पिछाडीस असणें ; लोकांपुढें , प्रसिद्धीस न येणें .
०लागणें   ( एखाद्याचा ) पिच्छा पुरविणें . तगादा करणें .
०पाय वि.  पिशाच्चयोनि . तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळाशीं । - तुगा ६५८ . मागें पुढें क्रिवि .
आजूबाजूस मागेंपुढें पाहून चाल , दांडग्यासारखा चालूं नको .
दोन्ही दिशांकडे , गोष्टीकडे ; दोन्हीपक्षी . ( शब्दशः व ल . ) मागेंपुढें पाहून काय करणें तें कर .
लवकर किंवा उशिरां ; आगेंमागें ; केंव्हांना केव्हां . तुम्ही असें करतां परंतु मागेंपुढें जाचील .
अस्ताव्यस्तपणें ; व्युत्क्रमानें ( पडलेल्या वस्तू ; बोललेल्या , केलेल्या गोष्टी ). हा ग्रंथ मागेंपुढें झाला आहे , नीट कर .
कांकूं , टंगळमंगळ करुन . हा मागेंपुढें करुं लागला .
केव्हां तरी ; कधी तरी ; आणखी एखांद्या वेळेस ; पुढच्या किंवा मागच्या बाजूस .
०करणें   माघार घेऊं लागणें ; कांकू करणें .
०कोणी   - वडील माणूस किंवा संतति नसणें ; आईबाप , बायकापोरें याशिवाय असणें . *** पाहणें - मुळींच न कचरणें . मला चोर भेटले तेव्हां मी मागेंपुढें न पाहतां त्यांच्या अंगावर तुटून पडलों .
नसणें   - वडील माणूस किंवा संतति नसणें ; आईबाप , बायकापोरें याशिवाय असणें . *** पाहणें - मुळींच न कचरणें . मला चोर भेटले तेव्हां मी मागेंपुढें न पाहतां त्यांच्या अंगावर तुटून पडलों .
०पाहून   - दूरवरचा विचार करुन , शहाणपणानें चालणें . मागमोरा , मागमोरा मोहरा - वि . पाठमोरा . [ दे . ] मागोमाग क्रिवि . लागलीच ; पाठोपाठ . [ मार्गे द्वि . ] मागोती , मागौता , मागौतिआं , माघौतीं - क्रिवि .
वागणें   - दूरवरचा विचार करुन , शहाणपणानें चालणें . मागमोरा , मागमोरा मोहरा - वि . पाठमोरा . [ दे . ] मागोमाग क्रिवि . लागलीच ; पाठोपाठ . [ मार्गे द्वि . ] मागोती , मागौता , मागौतिआं , माघौतीं - क्रिवि .
पुन्हां . तो दैववशें मागौता । जळेंचि लाहे । - ऋ ६२ . मागौतिआं निगलिआ । पवनवेगें । - शिशु ९०८ . माघौतीं न यों सर्वथा । - भाए ३२३ .
माघारी ; परत . स्वयंवरा आली उर्वशी । ते मागौती पाठवीलि साधुसीं । - शिशु २०२ [ मागें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP