Dictionaries | References

मागस

   
Script: Devanagari

मागस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Late: opp. to आगस Early;--used of crops &c. 2 Late, after being due--paying.

मागस     

वि.  
मागसलेला ; उशीराचा ; याच्या उलट आगस ( पीक इ० ).
उशीराचें ; योग्य काळानंतरचें ( देणें ). - क्रिवि . मागाहून ; उशिरां . ते तरी बहुत युगाचे राक्षस । रामलक्ष्मण जाहले मागस । - कथा ३ . ३ . १४९ . [ मागें ] मागसणें - अक्रि .
विलंब लागणें ; दिवसगत होणें ; लांबणें . यंदा पाऊस मागासला म्हणून धान्यें मागसलीं .
मागें राहणें ; मागसणींत पडणें ( मनुष्य , काम ). म्ह० आगसली ती मागसली , मागाहून आली ती गरव्हार झाली . मागासलेला वर्ग - पु . शिक्षणाच्या बाबतींत सुशिक्षितांच्या मागें असलेला वर्ग , जाति . मागसांडणें - सक्रि . ( कों . ) अंतरणें ; मागें टाकणें . [ मागें + सांडणें ] मागसावणें - अक्रि . ( कों . ) मागस केलें जाणें ; मागें , पाठीमागें टाकलें जाणें . [ मागसणें ] मागां , गा - क्रिवि .
मागें ; माघारें . आशीर्वाद घेऊनी द्विजा । मागा परतवी सहित प्रजा । - मुआदि १५ . ४९ .
पूर्वी . मागा योगिये समर्थ । त्यांचाहि निज स्वार्थ । - दा १ . ९ . ९१ . मागाऊन , मागाहून - क्रिवि . नंतर . मागाडा - क्रिवि . मागें . - शर . मागांत - क्रिवि . उशीरां ; उशीरानें ( धान्य पिकणें , वाढणें ). याच्या उलट अगांत . मागातली - स्त्री . ( कों . राजा . ) चुलीच्या मागची , चुलीच्या उंचीइतकी भिंतीपर्यंतची सपाट जागा . मागिलीकडे - क्रिवि . अंतर्मुख ; प्रत्यगात्म्याकडे ( वृत्ति फिरविणें ). - हंको .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP