|
स.क्रि. ( व ) मुरडणें . स.क्रि. झडप घालून पकडणें . एकदम धरणें ( धावणारा माणूस , चेंडू , वस्तु इ० ). एकदम खाऊन टाकणें ; मटामट खाणें . हुशारीनें चटकन पटकाविणें ( पैसा , नफा इ० ). एकदम घट्ट मिटणें ( तोंड , डोळे ). [ ध्व . मट ! ] मट , कन , कर , दिनीं , दिशीं , मटक्कदिशीं - क्रिवि . चटकन ; पटकन ; झटकन ; चुटकीसरशीं . ती त्या उंचवट्यावर मटक्कदिशीं बसली ; - कोरकि ४५७ . स्तब्धपणें ; मुकाट्यानें ; तोंड न उघडतां ; गुपचुप . ( क्रि० बसणें ; असणें ; राहणें ; होणें ). [ ध्व . ] मटकमटक - क्रिवि . अधाशीपणानें खातांना तोंडाच्या , ओठाच्या होणार्या आवाजाप्रमाणें आवाज करुन . मटगोळा - पु . एका दमात खाल्लेला कांहीं खाद्य पदार्थ . मुलानें भाताचा मटगोळा करुन टाकला . मटमट , मटां - क्रिवि . भराभर अधाशीपणानें खाणें , मुके घेणें , एकदम उठणें किंवा बसणें , एकदम कांहींएक वस्तु पकडणें इ० च्या होणार्या आवाजाप्रमाणें आवाज करुन . ( क्रि० खाणें ; जेवणें ; घेणें ; उठणें ; धरणें ; झेलणें ). देउनि मिटक्या मटमट घटघट त्या स्वाहितासृगुदका पी । - मोकर्ण ४५ . १४ . मटमटाविणें - सक्रि . मटकाविणें ; मटकन खाऊन टाकणें ; अधाशीपणानें भराभर खाणें . मटमुट , मटां - क्रिवि . माटमुट ; धागधूग ; धसधस ; धडधड होऊन . माझा जीव मटमुट करतो . मटाट , टां , मटामट , मुटां - क्रिवि ( मटमटचा अतिशय ) मटमट असा जोराचा आवाज करुन . मुके मटामट अगणित घेते । - आई .
|