Dictionaries | References

भोंगळा

   
Script: Devanagari
See also:  भोंगळ

भोंगळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   loose; lax. hollow. light.

भोंगळा

 वि.  
   सैल ; ढिलें ; न आवळलेलें ( गाठोडें , गठ्ठा , पोशाख इ० ).
   सैल कपडे घालणारा ; अजागळ ( मनुष्य ).
   अर्धवट ; मूर्ख ( मनुष्य ).
   अव्यवस्थित ; ढिलाईचा ( धंदा , काम ).
   पोकळ ; कमजोर ; भरींव नसलेला ( वासा , खांब , दाणा इ० ).
   हलकी ; पोकळ ( कवडी ).
   ज्याचें भोंक मोठें झालें आहे असा ( मोती ).
   ( व . ) नागवा ; नागडा ; वस्त्रहीन ; उघडा . [ भोंक . ]
०कवडी  स्त्री. ( ल . ) अजागळ , वेडसर मनुष्य .
०जमाखर्च   रकम - पुस्त्री केवळ दाखविण्यापुरता सरासरी अव्यवस्थितपणें ठेविलेला जमाखर्च किंवा दर्शनी रक्कम ; निश्चित नव्हे अशी रक्कम .
०तारीख  स्त्री. कोणत्याहि तारखेचा न जमलेला जमाखर्च .
०पणा  पु. सैलपणा ; ढिलाई ; अव्यवस्थितपणा . ... आणि फुकट भत्ता देणें यांत सरकारचा भोंगळपणा आहे . - इनाम १३४ .
०भट  पु. अजागळ , नेभळट ब्राह्मण ; पोकळभट .
०वही  स्त्री. अव्यवस्थित जमाखर्चाची वही .
०सुती   सूत्री - वि . सैल ; नेभळट ; अव्यवस्थित ; ढिलाईचा ; अजागळ ( काम , धंदा , भाषण , वागणूक , वक्ता , मजूर इ० ). भोंगळणें - सक्रि . ( कों . ) ढिला , सैल , अव्यवस्थित होणें ( गठ्ठा , गाठोडें , पोशाख इ० ). भोंगळी - स्त्री . ( अशिष्ट ) गचाळ , नेभळट , अव्यवस्थित , हिडीस स्त्री . भोंगळी - स्त्री .
   नळींतील पोकळी . ( यावरुन )
   नळी ; नळकाडें ; सुरळी ; वळी . नंतर कागदाचे भोंगळींत भरुन ... कडबोळीं करतात . - अग्नि ३ .
   ( कों . ) पाणी वहावयासाठीं माड इ० झाडाचा पोखरलेला नळ .
   पोकळी .
   कवलारु घरांवरील कौलें पडूं नयेत म्हणून वळचणीस ठोकलेली पट्टी ; गजभोंगळी पहा .
   ( अशिष्ट ) ढुंगण ; कुल्ले .
०कुलूप   भोंगळीचें कुलूप - न . नळीच्या आकाराचें देशी कुलूप .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP