Dictionaries | References

भुरकण

   
Script: Devanagari

भुरकण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The roar of a tiger &c. 2 fig. Violent outcry, a roar, bellow, bawl. v फोड.

भुरकण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The roar of a tiger, &c. Fig. A roar.

भुरकण     

 न. 
( राजा . ) वाघाची गर्जना .
( ल . ) जोराची ओरड ; गर्जना ; डरकी ; आरोळी . ( क्रि० फोडणें ).
आवरुन धरलेल्या रडण्याचा वेग अकस्मात बाहेर पडल्यानें होणारा मोठा शब्द . [ ध्व . भुर ! ] भुरकणें - अक्रि . गर्जना करणें ( वाघ इ० नीं ) - सक्रि . भुर्र असा आवाज करुन पिणें ; भुरका मारीत खाणें ( कढी , खीर इ० पातळ पदार्थ ). [ ध्व . ] भुरका , की - पुस्त्री .
भुर्र असा आवाज करुन पातळ पदार्थ ( कढी इ० ) मुखानें आंत ओढणें ; ओरपणें ; भुरकणें . ( क्रि० मारणें , घेणें ). आले ढेंकर दिधल्या मिटक्या बहुसाल मारिले भुरके । - मोउद्योग ७ . ७७ .
झुरका ( हुक्का इ० कांचा ). ( क्रि० मारणें , घेणें ). भुरकाटणें - अक्रि . ( कु . ) आनंदानें चढून जाणें ; हुरळणें . भुरकाड - न .
हलकें जळण ; भुर्रकन जळणारें द्रव्य ( काटक्या , धलप्या , गवत , लांकूड इ० ) भुरकाडी , ळी - स्त्री . हलकी व शुष्क काठी , काडी , धलपी . [ ध्व . ] भुरकाळ - पु . ( बे . ) एक प्रकारचें गवत . भुर , कन , कर , दिनीं , दिशीं - क्रिवि . विश्रांतिस्थलापासून पक्षी एकदम उडतांना , गवत इ० एकदम पेटतांना होणार्‍या आवाजाचें अनुकरण करुन , होऊन . भुरभुर पहा . [ ध्व . भुर्र ! ] भुरकूट - न . शुष्क धलपा , काटकीचा तुकडा ; भुर्रकन जळून जाणारें लाकूड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP