|
पु. चुरलेला , भुगा केलेला , भरडलेला पदार्थ ; पीठ . चुरलेला कागद , सुरकतलेला कपडा इ० . चुरल्याची , सुरकतल्याची स्थिति . तुकडेतुकडे झाल्याची , फुटल्याची स्थिति ( गाडी , भांडें , जिन्नस इ० कांची ). ( अतिशयोक्तीनें ) मोडल्याची , सांधे उखळल्याची स्थिति ( हिंदळणें , फार दपटणें , कुदळणें इ० नीं शरिराची ). ( क्रि० होणें ). [ भुगा , भगरा ] भुगा , गी - पुस्त्री . चूर्ण ; पूड . [ सं . भुग्र ; प्रा . भुग्ग ] ( गो . ) राख . भुगाभागा - वि . चूर्ण ; बारीक द्रव्य ; चुरलेला पदार्थ . [ भुगा द्वि ] भुगाळ - वि . भुसभुशीत ; भुगा झालेला .
|