-
पाणकणीस कुल, टायफेसी.
-
पाणकणीस या सामान्य व दलदलीत वाढणाऱ्या वनस्पतींच्या टायफा ह्या एकमेव वंशाचा अंतर्भाव करणारे एकदलिकित फुलझाडांचे कुल. याचा समावेश न्यूडिफ्लोरी अथवा नग्नपुष्पी श्रेणीत (बेंथॅम व हूकर) व केतकी गणात (पँडॅनेलीझ, एंग्लर व प्रँटल) केला जातो. प्रमुख लक्षणे- पाणथळ जमिनीत वाढणाऱ्या औषधीय वनस्पती, एकलिंगी फुले, परिदले नसतात. कणिश फुलोऱ्यात वर केसांनी वेढलेली पिवळट पुंपुष्पे व त्याखाली तशीच पण पिंगट स्त्री पुष्पे, केसरदले २-५, परागकणांचे चौकडे, किंजदल एकच व बीजकही एकच, वायुपरागण, फळ शुष्क, एकबीजी व केसाळ व बीज सपुष्क असते.
Site Search
Input language: