Dictionaries | References

भांजणें

   
Script: Devanagari
See also:  भाजणें

भांजणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To portion, distribute, share out. 2 In arithmetic. To perform भांजणी.

भांजणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Portion, share out; perform भाजणी

भांजणें     

अ.क्रि.  विष इ० उतरणें , नाहीसें होणें , शमणें . सवर्म ह्रदय कल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना । - ज्ञा २ . ७१ . [ सं . भंजन ]
उ.क्रि.  
भागणें ; विभागणें ; वांटणी , भाग करणें .
( गणित ) भांजणी करणें . [ सं . भाजन ] भाजक - वि .
विभागणारा ; भाग करणारा .
भागणारी संख्या ; जिनें भाज्याला भागावयाचें ती संख्या . [ सं ] भाजणी , भांजणी - स्त्री .
( गणित ) विशिष्ट वजाबाकी किंवा भागाकार ; हलक्या परिमाणाच्या अंकास भारी परिमाणाचें रुप देणें किंवा भारी परिमाणाच्या अंकास हलक्या हलक्या परिमाणाचें रुप देणें . ह्याचे दोन प्रकार आहेत - उतरती भांजणी व चढती भांजणी .
वांटणी ; वांटप ; विभागणी .
कोळपणी ; वखरणी .
( अशिष्ट ) बिघडविणें ; खराबी करणें ; विचका करणें . ( क्रि० मारणें ).
वर्ग ; भेद . राजस तामस सत्वगुणी । देवा दानवांची भांजणी । - कथा ४ . ५ . १७७ . भांजणी खांजणी , नी - स्त्री . क्षयवृद्धि . भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही । - तुगा ३९१५ . भाजित - वि .
( गणित ) भागलेला ; भागला गेलेला .
विभागलेला ; वांटणी , वांटप केलेला . भाज्य - न . ( गणित ) भाजकानें जिला भागावयाचें ती संख्या . - वि . विभागण्यास योग्य , जरुर , शक्य ; ज्याची वांटणी करावयाची आहे असें . [ सं . ]
०रेषा  स्त्री. दोन भाग निरनिराळे दाखविणारी रेषा ; ( इं . ) लाईन ऑफ डिमार्केशन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP