Dictionaries | References भ भबकणी Script: Devanagari Meaning Related Words भबकणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. भडकणी ; फुगवण ; सोसाट्यानें वाहणें ; वाघ इ० नीं धापा टाकणें .एखादें वाईट काम करण्याविषयीं एखाद्यास दिलेलें उत्तेजन उठावणी . ( क्रि० देणें ). [ भबकणें ] भबकणें - अक्रि .उठाव होऊन जलद सर्वत्र पसरणें ( आग , भुकणी , मिर्यें , वारा , धूळ , बातमी इ० ).सोसाट्यानें वाहणें ( वारा ).धापा टाकणें ; गर्जना करणें ( उडी मारतांना वाघ , संतापलेला मनुष्य यांनीं ).( ना . ) भभकणें ; संतापणें ; तोंडाचा पट्टा सोडणें . [ हिं . भबकना ] भबकावणी - स्त्री .भडकावणी ; सोसाटा ; घोघावणी ( वार्याची ).( वाघानें ) उडी मारतांना केलेली गर्जना .( ल . ) वाईट काम करण्याविषयीं उत्तेजन ; चिथावणी . ( क्रि० देणें ; दाखविणें ) भबकी , भपकी - स्त्री .झळ ( अग्नि , इ० ची ). भपकारा ; दरवळ ( मिरपूड इ० चा ).( ल . ) लौकिक वदंता ; भुमका . ( क्रि० उठणें ).उठावणी ; चिथावणी ; उत्तेजन . ( क्रि० देणें ; दाखवणें ).किंमत चढविणें ; वाढविणें . ( क्रि० करणें ).( हिं . ) धमकी .बढाई ; ऐट . याचे अंगीं वाघाचें शौर्य नसून भपकीची आवड मात्र होती . - नि ६०२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP