|
न. अर्धे मडकें , खापर . आंत विस्तव घातलेलें खापर . गोसावी , गोंधळी लोक हें विशिष्ट प्रसंगीं घेऊन डोक्यावर नाचतात ( क्रि० घेणें ). मस्तकीं भदें जाळावें । पोतें आंग हुरपळावें । - दा २ . ६ . ३० . वांकलेलें , फुटलेलें भांडें , फुटलेली टिमकी , कर्कश कंठ , कठोर आवाज , नासलेलें , बिघडलेलें काम , धंदा इ० कांस निंदेनें म्हणतात . त्याचे एकदां लाख रुपये फसले त्यामुळें त्याच्या व्यवहाराचें भदें झालें . [ भदें = पोकळ ] ०घेणें सक्रि . शेताच्या , गांवच्या वादग्रस्त सीमेवर जाऊन तेथें वरील प्रकारचें खापर हातांत घेऊन शपथविधि करणें . तोंडाचें भदें करणें शिवीगाळ करणें . ०भर वि. ( निंदार्थीं ) पुष्कळ .
|