Dictionaries | References

बुरसी

   
Script: Devanagari
See also:  बुरशी

बुरसी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
buraśī or sī f बुरसा m बुरबुरी f Mould, the concretion which gathers from dampness. v ये, चढ. 2 The tartar of the teeth.

बुरसी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f 
-सा  m  Mould; the tartar of the teeth.

बुरसी     

स्त्रीपु .
दमटपणामुळें पदार्थावर होते ती सूक्ष्म वनस्पतिरुप वाढ ; बुरा ; केनशी ; केंडशी ; भुरी . ( क्रि० येणें ; चढणें ).
दांतांवरील किटण . [ सं . बुरा ] बुरशेल , ला - वि .
ज्याला बुरशी आली आहे असा ; बुरसलेला .
( ल . ) घाणेरडा ; ओंगळ ; गचाळ ( मनुष्य . ) बुरसटणें - अक्रि . घाणेरडें , ओंगळ होणें ( विशेषत : तोंड , शरीर ). बुरसणी - स्त्री . बुरसणें ; बुरशी येणें . बुरसणें , बुरसावणें , बुरशेणें - अक्रि .
बुरशीनें युक्त होणें ; बुरा येणें .
साका चढल्यामुळें जीभ , कीट चढल्यामुळें दांत घाणेरडे होणें , असणें . [ बुरशी ] बुरसा - पु .
बुरशी ; केनशी ; भुरी ; घाण .
बुरशीमुळें पडणारा डाग .
आरशावरील पारा गेल्यामुळें झालेला कांचेचा उघडा भाग . - वि . घाणेरडा ; ओंगळ ; गचाळ . बुरसाविणें - सक्रि .
मळ , बुरशी , कीट , साका , इ० नीं ( अंग , भांडें , जीभ , दांत इ० ) युक्त करणें .
हिडीस , ओंगळ दिसें असें करणें . हा स्नान करतांना आंग चोळावें तें चोळीत नाहीं , बुरसावून मात्र येतो . [ बुरसा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP