Dictionaries | References

बाधावणें

   
Script: Devanagari

बाधावणें     

 न. १ वरधावा ; वरागमनप्रसंगीची मंगलवाद्यें ; आगमनसूचक वाद्यवादन , आगमनाची सूचना . उभविलीं गुडितोरणें। नगरीं जाहलीं वाधावणें । - कथा १ . १० . १९० . २ आमंत्रण ; मूळ धाडणें . येथ प्रवृत्ति पांडवांचे बाधावणें। - गीता १ . १९० . बाधावा --- पु . १ वरधावा ; वरागमनाची सूचना . वाधावा सांघो रुक्मिणी। - आद्य मराठी कवयित्री २९ . ३२ . २ आगमनवार्ता ; शुभवर्तमान ; वार्ता . तो अष्टभोगाचा कुढावा । की ऋतुरायाचा वाधावा। - शिशु ६२३ पाही आत्मज्ञान सुदिनाचा । वाधावा सांगत या अरुणाचा। - ज्ञा १८९०३ . ३ आगमनप्रसंगींचे वाद्य ; शुभवाद्य . वाद्यावें वाजती। - वसा २८ [ वरधावा ] वाधावी --- पु . वार्ताहर ; बातमी आणणारा . तये वेळीं वाधा वियातें । रायें हार दिधला उचितें। - कथा ७ . १० . १३९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP