|
न. कमर ; पाठीचा कमरेजवळील भाग . याचा प्रयोग पेकट , पेकाड , खट्टा या शब्दांप्रमाणें मोडणें , मोकळा करणें - होणें , ढिला करणें - होणें ( सामर्थ्य , दम , गर्व इ० मोडून टाकणें ) या क्रियापदांशीं जोडून तिरस्कारार्थीं होतो . खट्टा ( - पु . ) पहा . [ का . बगरु = ओरखडणें , बग्गु = वाकणें ] स्त्री. असडीक , न कांडलेले तांदूळ ; करड . ०मोड्या वि. मोडलेल्या पाठीचा ; कमर कमजोर झालेला ( निंदार्थी अशिष्ट शब्द ). [ बगड + मोडणें ] बगडा , ड्या वि . भाताचा कोंडा . [ बगडे ] मुरडलेला किंवा वांकडा झालेला ( बाहू , हात ). हात वांकडा झालेला ( मनुष्य ). ( काव्य ). सुंदर ; देखणा ; सुबक .
|