Dictionaries | References

प्रारब्धहीनाला सुवर्णाची मृत्तिका दिसते

   
Script: Devanagari

प्रारब्धहीनाला सुवर्णाची मृत्तिका दिसते     

ज्याच्य दैवांत नसतें त्याला वैभव किंवा संपत्ति प्राप्त झाली तरी लाभत नाही. एका मनुष्यानें बारा वर्षे तप केल्यावर त्याला ईश्वर प्रसन्न झाला व त्यानें त्यास वर भागवयास सांगितलें. तेव्हां त्यानें मला सायंकाळच्या आंत द्रव्य मिळावें असा वर मागितला. ईश्वरानें तथास्तुअ म्हटल्यावर हा घरीं जावयास निघाला. वाटेनें येतांना त्यास मध्येंच अंधळे लोक कसे चालतात याचा अनुभव घेण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणें तो डोळे मिटून चालूं लागला. मार्गात देवानें एक मोहोरांचा रांजण ठेवला होता. त्याला तो अडखळला पण त्यानें तो धोंडा समजून पायानें लाथडून दूर केला व तसाच तो घरीं आला. सायंकाळपर्यंत द्रव्य मिळालें नाहीं म्हणून पुन्हां देवास विचारतां त्यानें सांगितलें कीं, तुला मोहोरांचा रांजण वाटेंत आढळला पण तो तूं लाथेनें झुगारुन दिलास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP