-
न. १ एखादें काम , कृत्य . ' हे कर्म झालें समरांत जेव्हां । होतात कोठें रणभीरु तेव्हां । ' - वेणीसंहार ३ . २ स्नानसंध्या , यज्ञयागादि धार्मिक विधि ; याचे नित्य , नैमित्तिक व काम्य असे तीन भेद आहेत . ३ सांरतच्या आयुष्यातील कृति चाल , आचार , वर्तणुक ; यावरून दैव किंवा नशीब अशा अर्थानें योजतात - येथें दैव म्हणजे पूर्वजन्मार्जित पापपुण्याचा भोगवटा होय ; पुर्वजन्मकृत आचरण ; संचित .' अरे अरेकर्मा । बारा वर्ष झाली याच धर्मा ॥ ' या व्यापारांत मीं साफ बुडालो . माझें कर्म । दुसरें काय ?' ' कर्मबलिवंत ', कर्मबलत्तर ', ' घोर - कठिण कर्म ' या संज ` जा कर्माचें ( दैवाचें ) वर्चस्व , काठिण्य , निष्ठुरता दाखवितात . ४ विशिष्ट काम ; नैतिक कर्तव्य ; जाति , धंदा वगैरेनी मानलेलें आवश्यक कृत्य . ५ ( व्या .) कर्त्यानें अमुक क्रिया केली हें दाखविणारा शब्द ; कर्तृविषयक व्यापाराचें कारक ; कर्माची विभक्ति प्राय ; द्वितीया असते . ' रामा गाय बांधतो ' यांत गाय हें कर्म . ६ उद्योग ; कामधम्दा ; नेमलेलें , विशिष्ट प्रकारचें काम . ७ सुरतक्रीडा ; मैथुन ; रतिसुख ; संभोग .' त्यानें तिच्याशी कर्म केलें . ८ सामान्य क्रिया ; ऐहिक व्यापार ; मायिक क्रिया . ' माया हा सामान्य शब्द असुन तिच्याच देखाव्याला नामरुपें व व्यापाराला कर्म हीं विशिष्टार्थ नामें आहेत .' - नीर २६० . ( सं ,) ( वाप्र .) कर्म दोन पावलें पुढें - नशीब नेहमी आपल्यापुढें धांवत असतें .
-
०आड कर्म आडवें येणें ; आपत्ति ओढवणें . ' अन्न घेवोनि जों निघाली । तो कर्म आड ठाकलें । ' - ह १६ . १३० . कर्मानें ओढणें - ओढवणें - दैवाचा पाश येऊन पडणें ; दैवाधीन होणें . - नें जागें होणें - दैव अनुकूल होणें . - नें धांव घेणें - दैव पुढें येणेंज ; दैवाकडुन प्रतिबंध , अडथळा होणें . - नें पाठ पुरविणें - उभें राहणें - दैवानें मोडता , अडथळा घालणें ; कर्म ओढवणें . - नें मागें घेणें - सरणें - दैवानें साहाय्यंन करणें ; केल्या कर्माचें फळ - न . केलेल्या कृत्याचा परिणाम . ' केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील । ' अमृत , नव ४४३ . ( सामाशब्द )
-
ठाकणें कर्म आडवें येणें ; आपत्ति ओढवणें . ' अन्न घेवोनि जों निघाली । तो कर्म आड ठाकलें । ' - ह १६ . १३० . कर्मानें ओढणें - ओढवणें - दैवाचा पाश येऊन पडणें ; दैवाधीन होणें . - नें जागें होणें - दैव अनुकूल होणें . - नें धांव घेणें - दैव पुढें येणेंज ; दैवाकडुन प्रतिबंध , अडथळा होणें . - नें पाठ पुरविणें - उभें राहणें - दैवानें मोडता , अडथळा घालणें ; कर्म ओढवणें . - नें मागें घेणें - सरणें - दैवानें साहाय्यंन करणें ; केल्या कर्माचें फळ - न . केलेल्या कृत्याचा परिणाम . ' केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील । ' अमृत , नव ४४३ . ( सामाशब्द )
-
कर्म आड येणें-ठाकणें
Site Search
Input language: