-
न. १ ऊन ; सूर्याची उष्णता ; ताप . २ ( कों . ) फुपाटा ; कढत राख . ३ स्वच्छ आभाळ ; ढग नाहीत अशी स्थिति . [ सं . निरभ्र ? निर्भर ? ]
-
वि. १ जुना आणि चिंवट ; कोरडा आणि ताठ ; जून ( झाड , फळ इ० ). २ कठिण ; मजबूत ; घट्ट ; टणक ( दगड किंवा सर्वसाधारण कोणताहि पदार्थ ). विघ्न देखोनियां थोर । होय मत्स्य का सूकर । नातरी पाठी करोनि निबर । रुप धरी कमठाचे । - एरुस्व २ . १३ . ३ शिळे ( अंडे ). ४ जुना व खराब झालेला ( पदार्थ ); वृद्ध ; म्हातारा . बांधा नंदा निबरा , गोपानी मानिला सुमंदानि बरा । - मोकृष्ण ४४ . १९ . ५ प्रखर , तीव्र . जयाचा रश्मिपुंजु निबरु । होता स्वरुप उखरी स्थिरु । - ज्ञा १६ . ९ . [ सं . निर्भर - निब्भर - निब्बर ] निबरट , निबरड - वि . १ जून ; चिवट ; जुना ; टणक ; कोरडा आणि कडक ; वृद्धकळा आलेला ; घट्ट ; मजबूत बांध्याचा इ० ( वस्तु , मनुष्य , जनावर ). निबर पहा . तेआंही पासव मज निबरडा । उपमा वज्र कठीणा । - ऋ ९९ . २ जरा निबर , टणक .
-
०ढोण धोंड वि . अतिशय टणक , कठिण ( दगड , फळ , फोड , गळूं , पोट , भाकरी इ० ). [ निबर + ढोण ]
-
०पणा पु. कठिणपणा . अथवा स्वाधिकारु बुझे । आपले विहितही सुजे । परी करि तया उभजे । निबरपणा । - ज्ञा १८ . १८४ .
Site Search
Input language: