Dictionaries | References न नाहाण Script: Devanagari See also: नाहण Meaning Related Words नाहाण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 nāhāṇa & नाहाणघर Better नहाण & नहाणघर. नाहाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ नहाण पहा . अभ्यंगपूर्वक स्नान . २ स्त्रीचे प्रथम रजोदर्शन . [ सं . स्नान ; प्रा . ण्हाण ; हिं . न्हाना ] नाहणणे - उक्रि . १ ( दुसर्यास ) स्नान - न्हाऊं घालणे . २ ( ल . ) बुडविणे ; फसविणे ; लुबाडणे ; बुडला - फसला जाणे . पन्नास रुपयाला ते कूळ नाहणले . रक्ताने - घामाने नाहणणे - रक्त , घाम इ० कांनी अंग चिंब होणे , करणे ; अतिशय रक्त , घाम वाहणे , येणे .०माखण न. ( मुख्यत्वे स्त्रियांचे व मुलांचे ) अभ्यंगस्नान ; नहाण .०वणी स्त्री. देवाच्या अभ्यंगस्नानाचे पाणी ; तीर्थ . [ नहाणे + पाणी ]०वली नाहणुली नाहाणुली नाहणेली नाहणोली - स्त्री . पहिल्यानेच रजोदर्शन झालेली स्त्री ; प्रथम ऋतुमती , रजस्वला . [ नहाण + वाली ]०वेणी स्त्री. ( तंजा . ) स्त्रिया न्हाल्यानंतर पोकळ वेणी घालतात ती . नाहणी , न्हाणी स्त्री . १ देवळांतील तीर्थकुंड ; देवळांतील देवस्नानाचे पाणी बाहेर जीत पडते ती जागा . २ विटाळशीची मोरी ; विटाळशीच्या स्नानाची जागा . ३ ( सामा . ) मोरी ; गटार ; सांडपाण्याची खांच . देह नित्य मूत्राची नाहणी । - भारा बाल ९ . १० . ४ स्नानाची जागा ; नहाणीघर ; स्नानगृह सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणी । वैष्णवांचे नाहणी होईन किडा । - तुगा ११०० . नाहणे अक्रि . १ स्नान करणे ; अंग धुणे . म्हणोनि भलतेणे एथ सद्भावे नाहावे । - ज्ञा ११ . १० . २ रजस्वला होणे ; विटाळशी होणे ( विटाळशीला चवथ्या दिवशी स्नान घालतात त्यावरुन ). ती स्त्री पंधरा वर्षे नाहती आहे पण तिला मूल होत नाही . नाहू लागणे १ विटाळशी होऊं लागणे . २ वयांत येणे ; पदर येणे . ही स्त्री . नाहू लागली . उन पाणी थंड पाणी गंगा नाहणे ऊन , थंड किंवा गंगेच्या पाण्याने स्नान करणे . नाहूं घालणे १ ( लहान मुलास ) नाहणमाखण करणे ; तेल लावून स्नान घालणे . २ दुसर्यास स्नान घालणे . नाहतीधुती स्त्री . १ नहाण येऊन प्रौढदशा पावलेली स्त्री ; वयांत आलेली स्त्री . २ नेहमी वेळच्यावेळी विटाळशी बसणारी स्त्री . ३ विटाळ न गेलेली , म्हातारी न झालेली स्त्री . नाहवणी न . नाहणवणी पहा . नहाण , नाहाणघर नहाण , नहाणघर पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP