Dictionaries | References

नार्‍या

   
Script: Devanagari
See also:  बचंभट

नार्‍या

 वि.  कोणी तरी ; कोणीहि मनुष्य . [ सं . नारायण ] म्ह ० १ अडला नार्‍या गाढवाचे पाय धरी . २ नारो हसता केशाक केसो हसता नार्‍याक = ( गो . ) एकमेकाचे दोष काढणे .
  पु. ( व . ) नाद ; टुमणे . जायचा नार्‍या लावला , घेतला .
  पु. ( नाट्य . ) पौराणिक नाटकांत विश्वामित्र इ० ऋषींचें सोंग घेणारा वृद्ध मनुष्य तो बचंभट , व त्या ऋषींच्या शिष्याचें सोंग घेणारा एक लहान पोर तो नार्‍या . यास लटकीच्या नार्‍या असें म्हणतात . हीं दोन्ही पात्रें हास्यरसोत्पादक असत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP