Dictionaries | References

नादणे

   
Script: Devanagari

नादणे     

अ.क्रि.  १ राहणे ; वास करणे ; स्थाईक होणे ; सुखाने वसति करणे . आम्ही त्या गांवांत सात पिढ्या नांदलो . सुखे धृताचिया धवळारी बुद्धि नांदे । - ज्ञा ६ . ३७७ . २ सुखाने , भरभराटीने असणे ; पुष्कळ दिवसपर्यंत चांगल्या स्थितीत असणे . तूं ते सिद्धचि जो नेणे । तो नांदे सर्वज्ञपणे । - ज्ञा १७ . १४ . ३ वसति , गजबजलेले , भरभराटलेले असणे ( घर , खेडे इ० ). ४ उपयोगी असणे , पडणे ; टिकणे ; चालणे ; शेवटपर्यंत सुखाने जाणे . त्याने युक्ति काढिली , ती कांही नांदणार नाही . ५ जमणे ; समेटाने चालणे ; पटणे ; जुळणे ; सलोख्याने असणे . त्याचे व आमचे नांदत नाही . स्त्री नवर्‍याबरोबर नांदणे . ६ कबूल असणे , मान्य होणे . तो मुलगी देण्यास नांदत नाही . हा दहा रुपयाला नांदत नाही . ७ सांठविणे ; वागविणे ; सांभाळ करणे . [ सं . नंद = आनंद होणे ] नांदणूक - स्त्री . १ वसति ; रहिवास ; स्थाईक होणे ; घरदार कुटुंबसुद्धा जी पुष्कळ वर्षे स्थिति ती . हे मोहमांदूसी माया सदना । नांदणूकी करितात । - नव २२ . १९२ . २ वागणूक . ऐसी लोकांची जिये नांदणूक । - ज्ञा ९ . ५०७ ३ विवक्षित कालपर्यंत टिकाव ( कोणेक राज्यांत , कोणाच्या हातांखाली ). नांदणे - न . १ वास ; वसति . जगदुगुरु महेश्वर प्रभुशिरी जिचे नांदणे । - केका १०९ . २ वस्तिस्थान ; राहण्याचे स्थळ . की वृष्णेचे साजणे । लोभाचे नांदणे । - भाए ३०९ . नांदता - वि . १ लोकवस्तीचा , लोकांनी वसति केलेला ( गांव , घर , जागा ). २ लागवडीखाली असलेली ; वहित ( जमीन ). ३ भरभराटी , चलती असणारा ( व्यापारी , सावकार , कूळ ). ४ ( सामा . ) पुष्कळ दिवस व चांगल्या रीतीने राहणारा ; टिकणारा ; चांगला व टिकाऊ . ५ समृद्ध व सुखी ( कुटुंब ). नांदते घर - न . १ मुलाबाळांनी भरलेले व ऊर्जितावस्थेस आलेले घर , कुटुंब ; सुखी व समृद्ध कुटुंब . २ राहते घर ( पडित , बंद नव्हे ). नांदत्या घराची केरसुणी - स्त्री . स्वतःचा फायदा करुन घेणार्‍या माणसांची पुढेपुढे करुन सेवा करणारा चाकर , गडी . नांदवट - स्त्री . ( कु . ) नांदणूक . नांदायला जाणे - ( बायकी ) नवरी मुलगी पहिल्याने सासरी जाणे ; पहिलटकरीण सासरी जाणे . नांदविणे - उक्रि . १ वागविणे ; सलोख्याने सांभाळणे . २ समाविष्ट करणे ; अंतर्भाव करणे , ठेवणे ; सांचविणे . अजांड शतकोटि ज्या उदरि सर्वदां नांदवा । - केका १७ . ३ . रुढ होणे ; प्रचारांत आणणे . नाही ते नांदविले जेजे । मी तूं जगी । - ज्ञा १५ . २८० . नांदाविणे - उक्रि . १ नांदणे अर्थ २ पहा . २ नांदणे अर्थ ४ पहा . [ नांदणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP