Dictionaries | References न नाकीं नळ येणें Script: Devanagari See also: नाकीं नऊ येणें , नाकीं नव येणें Meaning Related Words नाकीं नळ येणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नाकाशीं नऊ प्राण येणें. वास्तविक नऊ प्राण हे शरीराच्या नऊ द्वारांशी असतात. पण अंतकाळी सर्व नऊ प्राण जणूं नाकाशीं येऊन मग सर्व प्राण जाऊन मनुष्य निर्जीव होतो. हीं नऊ द्वारें म्हणजेडोळे,कान,नाकपुडया,तोंडउपस्थ वगुदद्वार. याप्रंमाणेच नऊ प्राण असतात असें तैत्तिरीय संहितेंत म्हटलें आहे-‘ नव वै पुरुषे प्राणाः नाभिदर्शमी।’ हे नऊ प्राण वरील नऊ द्वारांशीं असतात ते सर्व नाकाशीं येणें म्हणजे अंतकाल समीप येणें.(नऊ इंद्रियांची शक्ति नाकांत येणें). मरणाच्या दारीं असणें.अतिशय कंटाळणें, दमणें, भागणें (कामानें, श्रमानें).अतिशय कष्ट, त्रास पडणें. ‘आपल्याकडे कारागीर लोकांची तब्येत सांभाळणें म्हणजे नाकीं नऊ येतात.’ -विवि. ‘इब्राहिमखान गारदी आपल्या कंपूचें बुरुज बांधून उभा होता. त्या जागेपर्यंत जाऊन पोंचण्यास त्याच्या नाकीं नव आलें.’-पामो ५५०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP