Dictionaries | References

नांगर

   
Script: Devanagari
See also:  नांगरडा , नागर

नांगर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  शेत वा जमीन नांगरपाचें आवत   Ex. शेतकार नांगरान शेत कसता
HYPONYMY:
बाखर
MERO COMPONENT OBJECT:
जूं फाळ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmহাল
bdहाल
benহল
gujહળ
hinहल
kanನೇಗಿಲು
kasالبٲنۍ
malകലപ്പ
marनांगर
nepहलो
oriହଳ
panਹਲ
sanहलः
telమడక
urdہل , قلبہ
noun  लोखंडाचो एक व्हड कांटो जो न्हयेंत वा समुद्रांत उडयले उपरांत बोट एका जाग्यार थीर उरता   Ex. नावीकान विसव घेवपा खातीर गंगेचे देगेर नांगर घालो
HYPONYMY:
नांगर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলঙ্গৰ
bdलंगर
gujલંગર
hinलंगर
kasکُنٛڑٕ
malഇരുമ്പിന്റെ വളരെ വലിയ മുള്ളു
marनांगर
mniꯑꯦꯡꯀꯔ
nepलङ्गर
sanअरित्रम्
tamநங்கூரம்
telలంగరు
noun  एक अस्त्र   Ex. बलरामाचें अस्त्र नांगर आशिल्लो जाका लागून तांकां हलधर लेगीत म्हणटात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasاَلبٲنۍ , ہَل
sanहलम्
urdہل
noun  जातूंत दोरी बांदून उदकांत व्हडें ओडटात असो लोखंडाचो एके तरेचो कांटो   Ex. तारवांक खूबशे नांगर लायतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benনঙ্গর
hinअँकोड़ा
kanಲಂಗರು
oriଲଙ୍ଗର
panਅੰਕੋੜਾ
noun  एके तरेचो ल्हान नांगर   Ex. व्हडेकार नांगर घालून विसव घेता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benআঁকশি
gujઅંકોડી
malചെറുനങ്കൂരം
oriଅଙ୍କୋଡ଼ା
panਅੰਕੁੜਾ
tamஅங்கோடா
urdانکوڑا

नांगर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The spindle of a plough. 3 An anchor. 4 fig. A pen with a coarse broad nib; a coarse tooth of a comb &c.; a stump. नां0 उचलणें-टाकणें-सोडणें To give up ploughing or agriculture. The Ryots do so in cases of oppression &c. नां0 धरणें with वर of o. To oppress. नांगरास पाळ A phrase signifying Laying hold of any little impediment to dawdle and loiter: also catching another up in his words. Pr. जेथें जावें तेथें ना0.

नांगर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The yoke-tie of a plough.
 m  A plough. The spindle of a plough. An anchor. A pen with a coarse broad nib.
नांगर उचलणें-टाकणेंसोडणें   To give up ploughing or agriculture. The Ryots do so in cases of oppression &c.
नांगर धरणें   To oppress.
नांगरास पाळ   Laying hold of any little impediment to dawdle and loiter: Pr. जेथें जावें तेंथें नांगर.

नांगर     

ना.  औत , जोत , फाळ , हल .

नांगर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा, लोखंडी, वजनदार आकडा   Ex. बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लंगर
Wordnet:
asmলঙ্গৰ
bdलंगर
gujલંગર
hinलंगर
kasکُنٛڑٕ
malഇരുമ്പിന്റെ വളരെ വലിയ മുള്ളു
mniꯑꯦꯡꯀꯔ
nepलङ्गर
sanअरित्रम्
tamநங்கூரம்
telలంగరు
noun  शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन   Ex. शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात
MERO COMPONENT OBJECT:
जू फाळ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
औत जोत
Wordnet:
asmহাল
bdहाल
benহল
gujહળ
hinहल
kanನೇಗಿಲು
kasالبٲنۍ
kokनांगर
malകലപ്പ
nepहलो
oriହଳ
panਹਲ
sanहलः
telమడక
urdہل , قلبہ
noun  गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा   Ex. जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गळ
Wordnet:
benনঙ্গর
hinअँकोड़ा
kanಲಂಗರು
oriଲଙ୍ଗର
panਅੰਕੋੜਾ

नांगर     

 पु. 
  1. शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी फाळ असलेले औत ; जोत ; हल . करी घेतला नागरु । - उषा १४१ .
  2. नांगरखुंटा .
  3. गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यांत टाकण्याचा सांखळीने बांधलेला लोखंडी मोठा , वजनदार आंकडा , गळ . यासारखे इतर साधन . साध्या होड्यांना नांगर म्हणजे एक दोरी लावलेला दगड असतो .
  4. ( ल . ) जाड टांकाची लेखणी ; फणीचा जाड दांता ; खुंट . [ सं . लांगल ; प्रा . णंगर ; सिं . लंगरु ; हिं . गु . लंगर ; पं . नंगल , लंगल ; का . नेगल ; फ्रेंजि . ननरी ] ( वाप्र . )

०उचलणे, टाकणे, सोडणे   शेतकाम सोडणे . ( जुलुमामुळे वगैरे ). ( अमक्यावर )
०धरणे   जुलूम करणे . 
०की  स्त्री. नांगरणे ; नांगरण्याचा व्यापार .
०खुंट  न. 
  1. ज्यांत फाळ बसविला जातो तो लांकडाचा ठोकळा .
  2. नांगर . - बदलापूर २८६ .

०चिनी  स्त्री. ( बे . ) रानांत आपोआप होणारे रताळे .
०जोत  न. 
  1. गांवच्या खोताला वेठ चाकरीच्या हक्काबद्दल दिलेली वस्तु ; अर्धेलीने खोताच्या नांगरास दोन बैल व एक मनुष्य एक किंवा अधिक दिवसपर्यंत देणे ; खोताच्या उपयोगासाठी दिलेली
  2. ( कर . ) नांगरण्याची मजुरी .
  3. नांगरण्याची क्रिया . -

०डा, नांगारदो  पु. ( माण . हेट . कु . ) नांगराचा जूं बांधण्याचा दोर .
०णी  स्त्री. 
  1. नांगरकी .
  2. जहाज नांगरणे ; नांगर टाकून गलबत थांबविणे .

०णी, दुणणी  स्त्री.  पुन्हां पुन्हां नांगरणे ; आडवे उणे नांगरणे .
०णे स.क्रि.  
  1. नांगराने शेत उकरणे .
  2. नांगर पाण्यांत सोडून गलबत थांबविणे .
  3. ( ल . ) त्रास देणे ; काळीज खणून दुखविणे .
  4. ( कों . ) कुदळीने खणणे .
  5. आडवे उभे नांगरणे ; पुन्हां पुन्हां नांगरणे .

दुणणे स.क्रि.  आडवे उभे नांगरणे ; पुन्हां पुन्हां नांगरणे .
०दांत  पु. नांगराचा फाळ . सवेचि परतावया पाहत । पायी घातला नांगरदांत । - एरुस्व १० . ५० .
०पंचमी  स्त्री. ( अशिष्ट ) नागपंचमी . या दिवशी नांगरणे बंद असते .
०पट्टी  स्त्री. दरेक नांगरावरचा सरकारी कर .
०बंदी  स्त्री. जमीनीऐवजी चालू असलेल्या नांगरावर पट्टी बसविण्याची रीत ; शेतकर्‍यास त्याच्या इच्छेप्रमाणे लागवड करुं देणे .
०मोड्या वि.  ( निंदार्थी ) नांगर्‍या ; शेतकरी .
०रान  न. 
  1. नांगरलेली जमीन .
  2. जिराईत ; काळी जमीन .

०वट, वठ, वठी  स्त्री.  नांगरलेली जमीन .
०वाडा  पु. 
  1. ( गलबताचे ) नांगर टाकण्याचे स्थान ; बंदर .
  2. बलबताचा नांगर टाकणे ; गलबत नांगरणे .

०वाळा  पु. ( बे . ) फाळाची कडी ; जानवे अर्थ ४ पहा . [ नांगर + वाळा ]
नांगरास पाळ     ( नांगरतांना एखादे झाडाचे मूळ आडवे आल्यास नांगर अडतो त्यावरुन ) दिरंगाई लावण्यास , रेंगाळण्यास कांही तरी क्षुद्र कारण पहाणे ; एखाद्याला त्याच्या शब्दांत पकडणे .
म्ह ० जेथे जावे तेथे नांगरास पाळ .

०वेठ  स्त्री. कुळाकडून वेठीने शेत नांगरुन घेणे ; सरकारी किंवा सरकारी अधिकार्‍यांची जमीन मजुरी न देतां नांगरुन घेणे . नांगरजोत पहा .
०जोत वि.  नांगरलेली ( जमीन ).
नांगरी  स्त्री.  लहान नांगर .
नांगरे कोनफळ , नांगर्‍ये  न.  ( कों . ) एक प्रकारचे कोनफळ किंवा गोरांडू . नांगरचिनी पहा .
नांगर्‍या वि.  
  1. नांगरण्याच्या कामांत पडलेला ; नांगरासंबंधी ; नांगरांस लावलेला ( माणूस , पशु ).
  2. ( ल . ) खेडवळ ; गांवढळ .
  3. शेतकाम करण्यासारख्या वयाचा ( गडी ).
  4. वडील ; पुढारी ( कुटुंब , कुळ , जाती , समाजांतील ).
  5. पाटीलकीचा अधिकार असलेला .
  6. तिरस्काराने वणजारी लोकांस म्हणतात . 

नांगर्‍या ऊंस  पु.  जमीन नांगरीत असतां नांगराने पडलेल्या सरीत कांडे खोवून लागण केलेला ऊंस - कृषि ४५६ .
नांगोर  पु.  ( अप . ) नांगर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP