Dictionaries | References न नव्हणे Script: Devanagari Meaning Related Words नव्हणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. न होणे , नसणे या अर्थी क्रियापद . नव्हता नव्हे , नव्हेस इ० रुपांतच उपयोग . देवा गोठिचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवे तल्लीनता । नव्हेल केवी । - ज्ञा ६ . ३३१ . [ न + होणे ] नव्हतां - धातुसाधित अव्यय . न होतां . संम्पूर्ण दिवस नव्हतां हाती । अंड येक फोडिले । - मुआदि ४ . ३४ . तूझा प्रसाद नव्हतां मज याच काळी । - वामन - रुक्मिणीपत्रिका १४ . नव्हता - वि . नसणारा ; नसलेला . नव्हतेनि वल्लभे । आहेवपण कां शोभे । - अमृ ६ . ६३ . नव्हसी - नससी ; नाहीस . श्रीकृष्ण भणे तो तूं नव्हसी । जै वैदर्भिए ते प्रणॐ आलासी । - शिशु १०७० . नव्हीजे - क्रि . न होईजे ; होणार नाहीस . एवं न करितां भगवद्भजन । अंती नव्हीजे पावन । - दा ७ . १० . २३ . [ न + होईजे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP