Dictionaries | References न नञ Script: Devanagari Meaning Related Words नञ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. न या अव्ययाबद्दल संस्कृत व्याकरणांत योजलेला पारिभाषिक शब्द . [ सं . ]०समास पु. त्याचा अभाव , त्यापासून भिन्न , तदभावविशिष्ट असा अर्थ विवक्षित असतां संस्कृत स्वरादि व व्यंजनादि शब्दांच्या मागे अनुक्रमे अन व अ या वर्णांचा योग होऊन होणारा एक प्रकारचा समास . जसेः - अब्राह्मण = ब्राह्मण नव्हे तो , ब्राह्मणाहून भिन्न ; अज्ञान = ज्ञानाचा अभाव , ज्ञानभावविशिष्ट असा ( मनुष्य ); अनंत ; अनादि ; अनुपम ; अनुचित ; अधीर ; अकाल ; अनाथ इ० . या समासाचे नञतत्पुरुष व नञबहुव्रीहि असे दोन प्रकार आहेत . उदा० अज्ञान = ज्ञानाचा अभाव . हा नञतत्पुरुष समास होय . परंतु अज्ञान = ज्यास ज्ञान नाही असा ; ज्ञानाभाव विशिष्ट ( मनुष्य इ० ). हा नञबहुव्रीहि समास आहे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP