Dictionaries | References

धडाडणे

   
Script: Devanagari

धडाडणे     

अ.क्रि.  १ ( तोफ , बंदूक इ० उडतांना ) धड धड असा मोठा आवाज होणे . २ ( वृक्ष इ० ) कडाडणे ; कडाडून पडणे . ३ ( अग्नि इ० ) धडधडणे ; जोराने धडकून पेटणे . डोंगर धडाडिती । तेथ अरुप पारखी रडती । आठै श्रीकृष्णसंकल्पे । धडाडली ब्रह्मशापे । - एभा १ . २३३ . जैसा प्रळयकाळीचा दावाग्नी । महावाती धडाडी । मुसभा १४ . ९१० . ४ ( कों . ) ( जमीन इ० तापल्यामुळे ) भेगलणे ; दुभंग होणे . ५ ( ऊर ) जोराने उडणे ; धडधडणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP