-
पु. १ लहान पर्वत ; टेकडी ; पहाड ; घाट . २ ( ल . ) मेहनतीचे काम ; काळजी करण्यासारखा आजार ; कर्जाचा बोजा , पाप , गुण , संकट , त्रास यांचे आधिक्य . ३ ( ल . ) काजळाचा गोळा , रास ( भांड्याच्या बुडावर धरलेली ) . ४ ( को . ) डोंगराळ मुलुखांत प्रथम नाचणी पेरलेले शेत . ५ ( कों ) शुष्क ; डोंगराळ प्रदेश ; नाचणी , वरी यांसारख्या पिकांच्या उपयोगी जमीन . [ प्रा . डुंगर ; गु . डुंगर ] ( वाप्र . ) डोंगर खणून ( पोखरुन ) उंदीर काढणे - अचाट परिश्रम करुन त्याची फलश्रुति फारच अल्प झालेली दाखविणे . डोंगरावरुन उडी टाकणे - क्षुल्लक गोष्ट करणे . उदा० हलकी देणगी देणे . डोंगरी दिवा लावणे - ( पेंढारी , लुटारु इ० ना भिऊन ) डोंगरात जाऊन राहणे ; वस्ती करणे . म्ह ० १ डोंगरास दुखणे आणि शिंपीत औषध . २ दुरुन डोंगर साजरा . सामाशब्द -
-
०कठडा कठाड कठाडी कांठ किनारा - पु . डोंगराची कड , हद्द , सीमा ; डोंगराच्या पायथ्यांच्या , आसपासचा प्रदेश . डोंगरकठाड्याचे गांवास रान लगत पडले .
-
०कणगर कंगर पु . डोंगर पर्वत ; डोंगराळ मुलुख ; टेकड्या .
-
०करी वि. डोंगरी ; डोंगरात राहणारे . डोंगरकरी कोण आहेत .... यांची जोराची चवकशी चालू केली . - अस्पृ . ४ .
Site Search
Input language: