-
स.क्रि. ( चाबूक , छडी , काठी इ० कानी ) मारणे ; चोप देणे ; प्रहार करणे ; शिक्षा देणे . [ सं . ताडन ]
-
स.क्रि. १ ( अनुमान , तर्क , कल्पना इ० कांनी एखादी गोष्ट ) जाणणे ; समजणे ; अटकळ करणे . त्याच्या मुखलक्षणावरुन म्यां ताडले की तो काम करुन आला . २ तुलना करणे ; पडताळून पाहणे ; अजमावून पाहणे ; तुलना करुन खरे - खोटे ठरविणे ; पडताळणे ( एखादे परिमाण , हिशेब , भाषण इ० ). मी हे माप पुण्याच्या मापाशी ताडले . त्याने सांगितलेली गोष्ट मी ताडली . हा गुणाकार दुसर्या रीतीने करुन ताडून पहा . [ फा .; हिं . ताड = समज ]
-
क्रि. अंदाज करणे , अजमावणे , अटकळ करणे , जाणणे , समजणे ;
-
क्रि. पडताळणे .
Site Search
Input language: