Dictionaries | References

दिगर

   
Script: Devanagari

दिगर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Also; additionally; further; besides; in the next place. A word common in notes. 2 Used of a village given in इनाम, in सरंजाम &c. in opp. to खालसा. Ex. दाहा गांव दिगर आहेत पांच खालसा आहेत.

दिगर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Also; additionally; besides.

दिगर     

क्रि.वि.  १ तसेच ; आणखी ; जास्त ; पुढे ; शिवाय ; भलते ; उलटे ; नंतर . २ अन्य ; इतर . मध्ये कोण्ही जो दिगर करील त्यास तंबी करुं . - रा १ . ४८ . ३ भलते . बाद कर्नेल गाडर याचे बोलणे व नजर पहिली राहिली नाही ? जबाब दिगर , सवाल दिगर करु लागले . - ख ७ . ३५७४ . ४ उलट ; विरुद्ध . तरी हे भाऊकडील सरंजामी गांवाचा बंदोबस्त करितील . आपणांकडून येविशी दिगर जाबसाल नसावा . - ख ११ . ५६५४ . ५ इनाम , सरंजामी खेड्यास लावतात . याच्या उलट खालसा . दाहा गांव दिगर आहेत पांच खलसा आहेत . [ फा . दिगर = इतर ]
०नंबर  न. जादा अथवा किरकोळ फेरिस्त ; सामान्य खाते .
०बाद वि.  १ अवांतर . दिगरबादे चौकी बादशहाचे अडीच तीनशे मैल - इमं १९९ . २ ( कायदा ) जमीनीचा मालक म्हणून सरकारकागदी असलेले एका इसमाचे नांव रद्द करुन त्या ठिकाणी दुसर्‍याचे नोंदणे . - लँड रेव्हेन्यू कोड
०मजमून   अ . शिवाय , दुसराः ताजा मजकूर . पत्रांतील दर कलमाच्या प्रारंभी लिहितात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP