Dictionaries | References

दर्मियान

   
Script: Devanagari
See also:  दर्म्यान

दर्मियान     

वि.  दलाल ; मध्यस्थ ; जबाबदार ; जामीन . दरम्यान मसूर घेऊन करा भरपाई , सोडा आम्हांला नानाला धाडिले पत्र घ्यावी खंडणी होऊं दे सल्ला । - ऐपो २३६ . - क्रिवि . १ मध्येच ; मध्यंतरी ; ज्याचा रुकार घेणे जरुर त्याचा सल्ला न घेतां स्वतःच एखादे काम करणे . मला विचारल्यावाचून दर्म्यान पागोटे का नेलेस . २ ( कों . ) चिकटून ; लागून ; जवळ . भलतया कमी जाण । आपण राहतो दर्म्यान । बद्धतेसि कारण तेचि होय । - सिसं ६२ . [ फा . दर्मियान ]
०येणे   मध्यस्थी करणे .
०की   गिरी स्त्री . जामीनकी ; मध्यस्थी . दर्म्यानकी बाळाजी शेटे वगैरे मंडळी करीत आहेत . - ख १० . ५२९६ . ते आमचे सेवक ... त्यांची दर्म्यानगिरी तुम्हाकडे नाही . - चित्रगुप्त ६९ .
०दार  पु. मध्यस्थ . दरम्यान्दाराकडील लबाडी असेल , विचाराने घ्यावे . - ख १०५६१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP