-
पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष . ह्याचा उपयोग ओझें वाहण्याच्या , गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात . ह्याच्या जाती अनेक आहेत . अरबी घोडे जगप्रसिध्द आहेत . लहान घोडयास तट्टू व घोडयाच्या पोरास शिंगरूं म्हणतात . घोडयाच्या आकृतीवरून , गतीवरून , उपयोगावरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात . २ बुध्दिबळाच्या खेळांतील एक मोहरा . हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें ( अडीच ) घर जातो . या मोहर्याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्यांच्या डोक्यावरून उडून जातो , तशी गति इतर मोहर्यांना नसते . ३ बंदुकींतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष . हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो ; चाप . ४ ( मुलांचे खेळ ) दोन पायांत काठी घालून ( तिला घोडा मानून ) मुलें धांवतात तो काठीचा घोडा . ५ ( उप . ) मूर्ख व ठोंब्या असा वयस्क मुलगा ; वयानें मोठा पण पोरकट मनुष्य . ६ वस्त्रें , कपडे ठेवण्यासाठीं खुंटया ठोकलेला खांब ; स्नान करणार्या माणसाचे कपडे ठेवण्यासाठीं खुंटया ठोकलेला खांब ; स्नान करणार्या माणसाचे कपडे ठेवण्याकरितां जमिनींत रोंवलेली काठी , खांब ; ( इं . ) स्टँड . ७ ( ल . ) शरीर वाहून नेतात म्हणून पायांस लक्षणेनें ( दहाबोटी ) घोडा असे संबोधितात ; तंगडया . आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हवें तेथें वाहून नेईल . ८ पाळणा टांगण्यासाठीं एका आडव्या लांकडाला चार पाय लावून करतात ती रचना ; घोडी . ९ पालखीचा दांडा ज्याला बसविलेला असतो तें दुबेळकें बेचक ; पालखीं तबेल्यांत वगैरे ठेवतांना ज्यावर ठेवतात तीं दुबेळकें असलेलीं लाकडें प्रत्येकीं . १० गाडयाच्या बैठकीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं लांब लांकडें प्रत्येकी ; गाडीच्या दांडयास आधार द्यावयाचें दुबेळकें . ११ मूल रांगावयास लागलें असतां दोन हात व दोन गुडघे जमीनीला टेकून करतें ती घोडयासारखी आकृति . ( क्रि० करणें ). १२ मृदंग ; पखवाज ठेवण्याची घडवंची ; घोडी ; ( दिवे इ० लावण्याची ) दोन बाजूस पायर्या असलेली घडवंची ; ( पिपें , पेटया ठेवण्याची ) लांकडी घडवंची . १३ नारळ सोलण्याचा , शेंडयास सुरी बसविलेला खांब ; नारळ सोलण्याचा एक प्रकारचा सांचा . १४ समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा चढ , फुगोटी , फुगारा ; लाटेचा उंच भाग ; नद्यांच्या मुखांतून वर गेलेलें समुद्राच्या भरतीचें पाणी . - सृष्टि ५७ . १५ ओबडधोबड असा आंकडा , फांसा , पकड . १६ ( ल . ) घोडेस्वार . तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवावा . - विवि ८ . ७ . १२९ . १७ दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे , परस्पराला जोडणारे दोन लाकडी तुकडे ( त्यांच्याच जोडीच्या खालच्या बाजूच्या तुकडयांस छिली म्हणतात ). १८ ( खाटीक इ० कांचें ) साकटणें , सकोटन ; खाटकाचा ठोकळा . १९ ( मुद्रण ) केसी व ग्याली ठेवण्यासाठीं केलेली घडवंचीवजा चौकट . २० फळा , चित्रफलक इ० उभा ठेवण्याची लाकडी उभी चौकट . २१ ( कों . ) रहाटगाडग्याचें कोळबें ज्यावर ठेवतात ती लांकडी चौकट . २२ ( पोहण्याचा ) चार भोपळयांचा तराफा . २३ ( गो . ) ( विटी दांडूचा खेळ ) विटी मारण्याचा एक प्रकार . ( क्रि० मारणें ). [ सं . घोटक ; प्रा . घोड ; गु . घोडो ; सिं . घोडो ; स्पॅनिश जि . गोरो ; अर . घोरा ] घोडी - स्त्री . १ घोडा या जातीच्या प्राण्याची मादी . २ सतार , तंबोरा इ० तंतुवाद्यांच्या भोपळयाच्या मध्यावर हस्तीदंती अगर लांकडाची पाटाच्या आकृतीची एक इंची किंवा दीड इंची पट्टीची बैठक ; तिच्यावरून तारा पुढें खुंटीस गुंडाळलेल्या असतात . ३ मुलांना शिक्षा देण्याकरितां जिला हातानें धरून शिक्षा दिलेला लोंबकळत असतो अशी आढयापासून लोंबणारी दोरी , फांसा ; मुलांस टांगण्यासाठीं उंच बांधलेली दोरी . अशी शिक्षा पूर्वी शाळांतून फार देत . ( क्रि० घेणें ; देणें ). एखाद्या मुलाशीं माझं वांकडं आलं कीं , रचलंच त्याच्यावर किटाळ आणी दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी . - चंद्रग्र ८० . ४ उभें राहून पखवाज वाजविण्याकरितां पखवाज ठेवावयाची घडवंची . इतक्यांत देवळाच्या एका कोंपर्यांत मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली . - सुदे २५ . ५ गवत इ० वाहण्याकरितां खटार्यावर उभारलेला सांगाडा , चौकट . ६ फळा जमीनीपासून उंच ठेवण्याकरितां व त्याला उतार देण्याकरितां केलेली लांकडी चौकट , सांगाडा . ७ वयस्क असून पोरकटपणा करणारी , खिदडणारी मुलगी ; खिदडी ; धांगडधिंगी ; भोपळदेवता ; घोडकुदळ . ८ ( सुतारी तासावयाचें लांकूड हलूं नये म्हणून त्याला आधारभूत असें दुसरें लांकूड , चौकट इ० सोईनें बसवितात तें . ९ ( विणकामांत ) सूत उकलण्यासाठीं केलेलें लांकडी चौकटीसारखें साधन . १० ( सोनारी ) पायांत घालावयाच्या सांखळ्यांच्या कडया वांकविण्यासाठीं असलेला बोटाइतका जाड असा निमुळता मोळा . ११ ( हेट . नाविक ) पोरकें ( लहान ) शीड उभें करण्यासाठीं असलेलें कमानीसारखें लांकूड . १२ बंधार्याच्या मुखाशीं ( पाणी सोडण्याच्या ठिकाणीं ) पडद्यासारखी बांधलेली भिंत . हिच्यावरून पाणी जात असतें . १३ ( हेट . ) गलबताच्या कडेस शौच्यास बसण्याकरितां टांगलेली लांकडी चौकट १४ सांकटणें ; सकोटण . घोडा अर्थ १७ पहा . १५ तीन पायांचे दिवा ठेवण्याचें बुरडी तिकाटणें , तिवई . १६ पाटास जे दोन आडात मारितात ते प्रत्येकी . १७ हत्तीवरील चौकट ; हौदा . साहेब नौबतीकरितां हत्तींवर लांकडी घोडी घालून ... - ऐरा ९ . ५०६ . १८ उभें खुंडाळें . ( इं . ) स्टँड . तिकोनी खुंटयांची घोडी आणि रुमाल ठेवावे - स्वारीनियम ७० . १९ सामान ठेवण्याचा घोडा . घोडें - न . १ सामा ( लिंगभेद न धरतां ) घोडा या जातींतील जनावर . कृष्णाकांठचीं घोडीं सडपातळ पण चपळ असतात . २ खटार्याच्या साटीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं उभीं लाकडें ; घोडा अर्थ ९ पहा . घोडकें अर्थ १ पहा . ३ चार भोंपळे लावलेला पाण्यावर तरंगणारा तराफा . घोडा अर्थ २१ पहा . ४ ( व . ) गाडीचे दांडे - जूं ज्यावर ठेवतात तें दुबेळकें . घोडा अर्थ ९ पहा . [ सं . घोडा ] ( वाप्र . ) घोडा आडवा घालणें - ( एखाद्या कार्यात ) अडथळा , विध्न आणणें . आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं ? - चंद्रग्र ६८ .
-
पु. १ एक मुलींचा खेळु . - मखे २३० . २ एक गवतांत आढळणारा क्रिडा . यास मुलें घोडा म्हणतात .
-
०उभा , उभा बांधणें - ( घोडा ) थोडा वेळ थांबवणें ; जरासें थांबणे ; घाई न करणें ९ घाईत व धांदलींत असणार्या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात . )
-
करणें , उभा बांधणें - ( घोडा ) थोडा वेळ थांबवणें ; जरासें थांबणे ; घाई न करणें ९ घाईत व धांदलींत असणार्या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात . )
Site Search
Input language: