|
क्रि.वि. तीन वेळा ; तीनदां . हा शब्द निश्चय , संकल्प , वचन , अपराध , दंड , धर्म , शिक्षा , बोध , उच्चारण इ० शब्दांसह समासांत खचित , निश्चित , निःसंदेह , ठाम , सक्त , जोराचा , नेटाचा इ० अर्थाने योजतात . [ सं . त्रि + म . वार ] ०पुण्य न. मी देतो , अर्पण करितो अशा अर्थाचे शब्द गंभीरपणे तीन वेळां उच्चारुन दिलेले ; अर्पण केलेले पुण्य . [ त्रिवार + पुण्य ]
|