|
वि. ( प्र . ) तीन ( संख्या ). तिन सप्तक सेविजे । - वैद्यक १५ . [ सं . त्रि ] ०तेरा वि. क्रिवि . उधळलेले ; नाश पावलेले . तीनतेरा पहा . ०न ( व . ) तिसर्यांदा ; तिसर्याने . ०व्या वि. तिसर्या . तिनव्या मासी कंथाला ठाव । हळदीकुंकवाची लल्लाटी लेव । ( वासुदेवगीते ) - मसाप ६ . ४६ . ०सांज जा , तिनिसांज जा , तिनि ( न्हि ) सांजां क्रिवि . संध्याकाळच्या वेळी . ०सान स्त्री. ( कु . ) संध्याकाळ . [ तिनिसांज अप . ] ( वाप्र ) फुटक्या तिनीसांजा ऐनसंध्याकाळी . तिनी ( न्हि ) ताळ पु . तीन लोक ( स्वर्ग , मृत्यु , पाताळ ); त्रिखंड . तिनीत्रिकाळ अ . तिन्ही वेळां ( सकाळी , दुपारी , संध्याकाळी ). तिन्हीप्रस्थान गीता , उपनिषदे व ब्रह्मसूत्रे ( शारीरभाष्य ) हे तीन ग्रंथ ; प्रस्थानत्रयी . तिन्हीबंद ध पुअव . मूळ , जालंधर , उड्डियान असे तीन बंध . आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध । करुनि एकवद । वायुभेदा । - ज्ञा १८ . १० . ३७ . तिन्ही राम पुअव . दाशरथीराम , परशुराम आणि बलराम असे तीन राम . तिन्ही लोक पुअव . स्वर्ग , मृत्यु , व पाताळ . तिन्हीलोक गाती सदा आवडीने । - राक ८ . तिन्ही वस्त्रे नअव . नेसण्याचे , पांघरण्याचे व डोक्यास गुंडाळण्याचे पागोटे वगैरे अशी पुरुषांची तीन वस्त्रे . पुरुषांलागी सप्त भूषणे । तिन्ही वस्त्रे कनकवर्णे । द्वादशांगी अलंकार लेणे । स्त्रियांस देणे तैसेचि । - ह ३४ . १६२ . तिन्हीस्थाने नअव . नेत्र , कंठ आणि हृदय ही स्थाने ( याशिवाय सामासिक शब्द तीनमध्ये पहा ). [ सं . अप . ]
|