-
स्त्री. नृत्य . दृष्टीमध्ये निश्चलता , विकसितपणा व सात्विकता दाखविण्याचा अभिनय . हा अभिनय उत्साहवृत्तीस अनुकूल आहे .
-
स्त्री. १ नेत्रगोलस्थित जे पाहण्याचे इंद्रीय आहे त्याची वृत्ति , कार्य तिने झालेले ज्ञान ; पाहण्याचे सामर्थ्य ; नजर . २ ( ल . ) ( एखाद्या गोष्टीकडे द्यावयाचे ) लक्ष्य ; अनुसंधान . निरंतर शास्त्राकडे दृष्टि ठेवावी तेव्हा शास्त्र येते . त्यास पागोटे द्यावयाचे खरे परंतु माझी दृष्टी चुकली . ३ ( ल . ) सत , असत जाणण्यासास कारणीभूत असलेली मनोवृत्ति ; एखादुयाकडे पहाण्याचा , एखाद्याशी बोलण्याचा . एखाद्याशी वगण्याचा . रोख ; कल ; मनोवृत्ति . अलिकडे त्याची दृष्टी फिरली आहे . ४ ( राजा . ) पाषाणाच्या देवाच्या मूर्तीस रुपे इ० कांचे डोळे बसवितात त्या डोळ्यांपैकी प्रत्येक . ५ दृष्ट ; वाईट , बाधक नजर . दृष्ट २ पहा . ( क्रि० होणे ; काढणे ). राधा म्हणत्ये हा ! मज पुत्रवतीची लागली दृष्टि । - मोस्त्री ५ . ५ . - वि . पाहणारा , दर्शी पहा . समासांत उपयोग जसे - गुणदृष्टि ; स्थूलदृष्टि ; दोषदृष्टी इ० . [ सं . ] ( वाप्र . )
-
०ओळखणे ( एखाद्याच्या ) नजरेवरुनच , चेहर्यावरुन त्याचे मनोगत ओळखणे .
-
०काढणे उतरणे ओवाळून टाकणे एखाद्यास वाईट दृष्टीची झालेली बाधा मंत्रतंत्र , तोडगा इ०काने काढून टाकणे . खालून जाणे ( एखादी गोष्ट , वस्तु इ० एखाद्याच्या ) डोळ्याखालून , नजरेतून जाणे ; स्थूलपणे माहित असणे . ज्यांचे दृष्टीखालून गेले । ऐसे कांहीच नाही उरले । - दा १ . ६ . ९ .
Site Search
Input language: