|
क्रि.वि. १ विपुलतेनें ; भरपूर ; पुरेपूर ; वाहून जाण्याजोगें ; अतिशय ( टोंचल्याबरोबर उपयोग ). २ अतिशय ; विपुल ( रडणें , डोळयांत पाणी येणें , सारखें खुपणें , जोरानें ठणकणें या क्रियांचा आवाज , प्रकार यांचें अनुकरणवाचक ). टचाचणें - अक्रि . ( टचटचणेंचा अतिशय ) जोरानें , सारखें खुपणें ; ठणकणें ; सळक मारणें ; ठुसठुसणें ( गळू , इ० ). [ टच ! टच ! ] टचाचून , टचाचा , टचाटच , टचाटचां - क्रिवि . टचटच , टचटचून यांचीं आधिक्यदर्शक रूपें .
|