Dictionaries | References

झुळकी

   
Script: Devanagari
See also:  झुळक , झुळूक

झुळकी     

वि.  ( क . ) आलवणी रंगाचें आडवें सूत व कुंकवासारख्या भडक रंगाचें उभें सूत घालून विणलेलें अशा रंगाचें ( लुगडें ). झुलकी रंगाचें लुगडें लवकर विकतें .
 स्त्री. १ वार्‍याची मंदगति , लहर वारेयांची झुळकी आली । - शिशु ६१३ . २ ( ल . ) अनुकूल वेळ , संधि . ( क्रि० वहाणें ). व्यापार करीत असावें , एकाद वेळ झुळूक वाहिली म्हणजे फलद्रूप होईल . ३ अंधुक , अस्पष्ट देखावा ; अपूर्ण दृश्य ; ( वस्तूच्या ) आकाराचा किंचित भास . ४ ओघ ; मार्ग ; अखंड प्रवाह , चलती , प्रवृत्ति ( वारा , विशेष प्रकारची हवा , पाऊस , ऊन्ह , थंडी , व्यापारधंदा , रोगराई , सांथ इ० ची ). ५ अल्प अनुभव . ६ ( ल . ) तकाकी ; चकाकी . - क्रिवि . झुळझुळ पहा . ( क्रि० वाहणें ). [ सं . दोल ; प्रा . झुल्ल ; घ्व . झुळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP