Dictionaries | References झ झांसा Script: Devanagari Meaning Related Words झांसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( दुसर्याला लुबाडण्याची , इजा किंवा दु : ख देण्याची , वाईट करण्याची ) धमकावणी ; दहशत ; दपटशा ; धाक ; भीति ( त्रागा याच्या उलट अर्थी ); अमुक गोष्ट न केल्यास पुढें तुझें अमुक तर्हेनें वाईट करीन अशी ( एखाद्यास ) सूचना ; धमकावणी . मनाचा बलात्कार कैसा । निर्गुणी पाडी गुणाचा फांसा । लावूनि जीवपणाचा झांसा । संसारवळसा आवर्ती । - एभा २३ . ६१७ . २ लुटालूट ; पुंडगिरी ; उकळेगिरी . ... झांसा करण्यास कोणी माणूस निघेल आणि त्यामुळें बंड , फितुर होईल तर माजिस्त्रेटानें सदर अदालतीची आज्ञा घेऊन ... - न्यासे १०० . [ सं . झष = मारणें , इजा करणें हिं . झासा = दगा ; धोका ; गु . झासो = राग , त्रागा ] पु. तळमळ . लाविसी हरि किती मज झांसा । - सारुह ४ . ११७ . [ सं . ध्यास ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP