Dictionaries | References

जोंजार

   
Script: Devanagari
See also:  जोजार

जोंजार

  पु. १ कुटुंबादिरूप मोठा संसारखटला , मंडळी , पसारा , व्याप ( मोठा त्रासदायक व पोसण्यास कठिण ). जोंजार प्रसवलासि बहुवसु । - ऋ ३२ . नसोनि कांहीं जोजारसंन्यासाश्रम शुध्द सार । - निमा १ . १६७ . २ ( ल . ) बोजा ; त्रास ; जंजाळ ; भार ; कष्ट ; ओझें . तरी जन्मौनि जोजारु साहिजे । - ज्ञा ४ . ३४ . कर्जाचा - कुटुंबाचा - घेण्यादेण्याचा इ० जोजार . ( व . ) जोजवार ३ कटकट ; त्रास ; कष्ट ; खटपट . कासया करिसी जोजार । - दा ३ . १० . ४८ . म्ह० ज्याचा भार त्याला जोजार . जोजारणें , जोजावणें - अक्रि . १ मोठें कुटुंब , खटला असणें ; त्याच्या जबाबदारीखालीं वांकून जाणें . २ त्रासणें ; कष्टणें . प्रलयकाळीं जोजावलासि । - कथा ७ . ७ . १४६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP