Dictionaries | References

जीव भांड्यांत पडणें

   
Script: Devanagari

जीव भांड्यांत पडणें

   हायसे वाटणें
   स्‍वस्‍थ होणें
   मनावरील दडपण दूर होऊन स्‍वस्‍थता वाटूं लागणें. ‘आज संस्‍थानी प्रजेचा जीव थोडासा तरी भांड्यात पडेल असे म्‍हणण्यास’ -सासं २.१९५. ‘माझा एक जीव भांड्यात पडला.’ -निरभ्र चंद्र ४०. ‘हा जो तह झाला त्‍याने नानाबापू यांचे जीव थोडे दिवस भांड्यांत पडल्‍यासारखे झाले.’ -V.S. २.१५६. -छच ८१. ‘ज्‍या अँग्‍लोइंडियन वृत्तपत्रांनी व गृहस्‍थांनी मद्यपानबंदीविरूद्ध सारखा टाहो फोडला होता, त्‍यांचा जीव एकदाचा दारूच्या भांड्यांत पडला.’-केसरी २६-७-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP