Dictionaries | References

जावळारावळा

   
Script: Devanagari
See also:  जावळा

जावळारावळा     

वि.  १ जुळें ; एकाकाळीं , एकागर्भांतून उत्पन्न झालेलीं दोन अपत्यें . पुत्र जावळे प्रसवली । - मुआदि २७ . २२५ . २ जुळयांतील एक ; जुळा भाऊ . कौस्तुभाचा जावळा । - मुसभा १४ . ४८ . - स्त्रीअव . जावाजावा ( एक वचन जाऊळ ) [ सं . यमल ; प्रा . जमल ] जावळफळ - न . जुळें फळ ; जोडफळ . परस्परें क्षेम कवळीं । उभयतनू जाल्यामेळीं । जावळफळापरी । - मुवन ८ . १९४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP