Dictionaries | References

जथ

   
Script: Devanagari
See also:  जतीमता , मथी

जथ

  स्त्री. जूट ; जमाव ; समुदाय . [ सं . यूथ ] जथणें - सक्रि . १ एके ठिकाणीं जमणें ; युक्त्या - प्रयुक्त्या करून एकत्र जमविणें , गोळा करणें ( पैशाची रक्कम ) तयार करणें , बांधणें ( इमारत ); एका रांगेंत जमणें , उठणें चालीस लागणें ; आरंभ करणें ( दुकान , धंदा इ० ). मी युक्तिप्रयुक्तीनें हजार रुपये जथले होते . चौघांकडून चार लांकडें आणून एकदांचें घर जथलें . धोंडयावर धोंडें घालून लग्न जथलें . २ तयार करणें , रचणें ( पुस्तक ) ३ जोडणें ; जुळविणें . कोणती कशी गोष्ट मी जथूं । कचेसुच १६ . ( गो . ) जथचें = जुळून येणें , सांचणें . जथविणें - सक्रि . जमविणें ; गोळा करणें ; एकत्र आणणें ; घडवून आणणें .
  स्त्री. एकजूट , एकविचार संयोग ; एकमत . २ ( कायदा ) एकाची पूर्णपणें किंवा पुष्कळांची पृथकपणें किंवा सर्वाबद्दल एकाची , किंवा प्रत्येकाची स्वत : बदल आणि सर्वांबद्दल जबाबदारी ; एक जती एक मती पहा . [ सं . युति + मति ; जथणें + मथणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP